The villagers attacked the police who were raiding the gambling den with sticks, the police personnel were injured.

जगदेवराव भावसिंग साबळे यांच्या घरी छापा टाकून काही जुगार खेळणाऱ्या इसमांना रंगेहात पकडून कार्यवाही सुरू केली. तेव्हा गावचे सरपंच भेरलाल रावसिंग साबळे यांनी कारवाईत हस्तक्षेप करून, मी या गावचा सरपंच आहे. तुम्ही माझ्या परवानगी शिवाय गावात रेड कशी काय करता, असे म्हणून पोलिसांना लोटून देवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

  उमरखेड :  जुगार अड्ड्यावर धाड टाकणाऱ्या पोलिसांवर गावातील जमाव गोळा करून लाट्या काठ्यांनी हल्ला (Attack with wave sticks) करण्यात आला. यामध्ये चार ते पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले. ही गंभीर घटना उमरखेड तालुक्यातील( Umarkhed Taluka) मथुरा नगर जेवली येथे ३१ जुलैला रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली.

  पोलिस उपनिरीक्षक कपिल म्हस्के, अतिष जारंडे, मोहन चाटे, गजानन खरात  व अन्य अशी हल्यामध्ये जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांनी नावे आहेत. बिटरगाव पोलीस स्टेशन( Bittergaon Police Station) अंतर्गत येत असलेल्या मथुरानगर जेवली येथे ३१/०७/२०२२ रोजीचे रात्री जगदेवराव भावसिंग साबळे यांच्या घरी मोठ्या प्रमाणावर जुगार पत्याचा पैश्याची बाजी लावून एका बादशाह नावाचा जुगार चालू असल्याची गोपनीय माहिती बिटरगाव ठाणेदार प्रताप भोस यांना मिळाली होती.

  सदर माहिती त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी पाडवी (Sub Divisional Police Officer Padvi) यांना देवून छापा कार्यवाहीची परवाणगी घेवून पोलिसांनी कारवाईच्या अनुषंगाने जेवली येथे रवना केली. पथकाने माहिती प्रमाणे दोन पंचासह पथकास मथुरा नगर जेवली येथील जगदेवराव भावसिंग साबळे यांच्या घरी छापा टाकून काही जुगार खेळणारे इसमांना रंगेहात पकडून कार्यवाही सुरू केली. तेव्हा गावचे सरपंच भेरलाल रावसींग साबळे यांनी कारवाईत हस्तक्षेप करून, मी या गावचा सरपंच आहे. तुम्ही माझ्या परवानगी शिवाय गावात रेड करीता कसे काय आले, असे म्हणून पोलिसांना लोटून देवून शासकीय कामात अडथळा केला.

  एव्हढेच नव्हे तर तेथील जुगाऱ्यांना त्या घरातून बाहेर काढले. व गावातील इतर नागरीक व महिलांना भडकावून जमाव गोळा केला. त्या जमावाने व जुगार खेळणाऱ्या लोकांनी पोलिसांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. यामध्ये कार्यवाही करीता गेलेले पोलीस उपनिरीक्षक कपिल म्हस्के, अतिष जारंडे, मोहन चाटे, गजानन खरात हे जखमी झाले आहेत. जमादार विध्या राठोड यांच्या फिर्यादी वरून पोलिसांवर हल्ला करणारे लोकांचे विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या वरून अपराध नंबर २२९/२०२२ कलम ३५३, ३३२, १४३, १४५, १४७, १४९, ३२३, ३२४, २९४, ५०४, ५०६ भा.द.वी सह कलम ४,५ महाराष्ट्र जुगार अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला.

  हल्लेखोर दोघांना अटक

  हल्लेखोर जगदेवराव भावसिंग साबळे, व त्याचा भाऊ साहेबराव भावसिंग साबळे यांना पोलीसांनी ताब्यात घेवून अटक केली. त्यांचा पि.सी.आर घेण्याकरीता आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सरपंच भैरवलाल साबळे व इतर हाल्लेखोर आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेवून तात्काळ अटक करण्याकरीता पथक नेमून रवाना करण्यात आले आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी (Sub Divisional Police Officer ) उमरखेड प्रदीप पाडवी यांनी भेट दिली असून त्यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रताप भोस गुन्हाचा तपास करीत आहेत .

  गावातील महिलांनी केली होती तक्रार

  जुगार खेळण्यासाठी व्याजाने पैसे काढणे तसेच शेती गहाण ठेवून पैसे काढून जुगार खेळणाऱ्या पुरुषांमुळे गावातील काही कुटुंब उघड्यावर आली आहेत. त्यामुळे या संदर्भात काही महिलांनी बिटरगाव पोस्टेचे ठाणेदार प्रताप बोस यांची भेट घेऊन आम्ही तक्रार जर दिली तर आमच्या घरातील पुरुषांकडून आमच्यावर दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे, आपण आमच्या कुटुंबाचा विचार करून संबंधित जुगार अड्ड्यावर धाड टाकून जुगारी लोकांना धडा शिकवावा अशी विनंती काही महिलांनी केली होती.