नव्या प्रभाग रचनेला राष्ट्रवादीचा विरोध!राज्यसरकारने काढलेली प्रभाग रचना अध्यादेश ही लोकशाहीची पायमल्ली

मंगळवारी रात्री राज्यसरकारने घाईगडबडीत २४ महापालिकेची नव्याने प्रभाग रचना करण्याचे जो अध्यादेश काढण्यात आला. महापालिका आयुक्त यांना देण्यात आला हा अध्यादेश लोकशाहीची पायमल्ली करणारा असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष राज्य शासनाच्या निर्णयाचे विरोध करून निषेध करतो, अगोदर महापालिका निवडणूक घेण्यास उशीर झाला.

    हडपसर : मंगळवारी रात्री राज्यसरकारने घाईगडबडीत २४ महापालिकेची नव्याने प्रभाग रचना करण्याचे जो अध्यादेश काढण्यात आला. महापालिका आयुक्त यांना देण्यात आला हा अध्यादेश लोकशाहीची पायमल्ली करणारा असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष राज्य शासनाच्या निर्णयाचे विरोध करून निषेध करतो, अगोदर महापालिका निवडणूक घेण्यास उशीर झाला. प्रशासन बसविण्यात आले. आता आणखी सहा सात महिने नव्याने प्रभाग रचना करण्यात वेळ घालवणार शिंदे आणि फडणवीस सरकारला निवडणुका नको आहेत, यांना लोकशाही नको आहे यांना प्रशासनच बसवायचे आहे, स्थानिक  स्वराज्य संस्था ,महापालिका,नगरपालिका, प्रभाग रचना  संदर्भात  २८ तारखेला सुनावणी असताना  प्रकरण अंतीम न्यायप्रविष्ट असताना ,कुठला निकाल लागला नसताना राज्यसरकार प्रभाग  रचना निर्णय घाईत घेतले आहे हे संशयास्पद आहे, सर्वोच्च न्यायालयाचा अवमान  करणारा आहे, सर्वोच्च न्यायालयात सर्व पुराव्यानिशी कागदपत्र सादर केले आहे. सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे.भाजप हा रडीचा डाव खेळत आहे,अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप  यांनी शोसल मीडियासमोर बोलताना दिली.