कामगारानेच घर मालकाच्या घरातून २२ लाखांची रोकड चोरली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कर सल्लागार आहेत. ते सॅलसबरी पार्कमधील एका सोसायटीत राहायला आहेत. आरोपी मुकेश महाराज त्यांच्याकडे स्वयंपाकी म्हणून काम करत होता. मुकेशने त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधत कपाटातील २२ लाखांची रोकड चोरली.

    पुणे : ज्येष्ठ नागरिकाच्या घरातील कामगारानेच २२ लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. सॅलसबरी पार्क परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी मुकेश महाराज उर्फ रामजांदू (वय २४, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कर सल्लागार आहेत. ते सॅलसबरी पार्कमधील एका सोसायटीत राहायला आहेत. आरोपी मुकेश महाराज त्यांच्याकडे स्वयंपाकी म्हणून काम करत होता. मुकेशने त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधत कपाटातील २२ लाखांची रोकड चोरली. रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने चौकशी केली. घरात स्वयंपाकी म्हणून काम करणारा आरोपी मुकेश कामावर न आल्याने त्याच्यावरचा संशय आला. या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे तपास करत आहेत.