पुर्वीच्या कामागारानेच बेकरी फोडली अन् रोकड पळविली; भवानी पेठेतील प्रकार उघडकीस

बेकरीत वर्षभरापुर्वी काम करणाऱ्या आणि नुकताच कामासाठी आलेल्या कामगारांनी संगणमत करून बंद बेकरीचे कुलूप तोडून गल्ल्यातील तब्बल ७ लाख ८० हजारांची रोकड चोरून पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

    पुणे : बेकरीत वर्षभरापुर्वी काम करणाऱ्या आणि नुकताच कामासाठी आलेल्या कामगारांनी संगणमत करून बंद बेकरीचे कुलूप तोडून गल्ल्यातील तब्बल ७ लाख ८० हजारांची रोकड चोरून पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भवानी पेठेतील न्यु गार्डन बेकरीत हा प्रकार घडला आहे.

    याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात मोहंम्मद हव्वारी (वय ४२, रा. भवानी पेठ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची भवानी पेठेत न्यु गार्डन बेकरी आहे. त्यांच्याकडे यातील एक कामगार वर्षभरापुर्वी कामास होता. त्याने येथील काम सोडले होते. त्यानंतर आठच दिवसांपुर्वी नवीन एक कामगार त्यांच्या बेकरीत कामासाठी आला होता. मात्र, मंगळवारी रात्री बेकरी बंद झाल्यानंतर दोघांनी संगणमत करून कुलूप हॅक्सा ब्लेड व स्क्रु ड्रायव्हरने तोडून आतील ७ लाख ८० हजार रुपयांची रोकड चोरून पोबारा केला. सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर सीसीटीव्हीतून हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.