व्यसनाधीन तरुण पिढीला ज्येष्ठांचे मार्गदर्शन आवश्यक : शिवलिला पाटील

आजची युवा पिढी व्यसनाधीनतेकडे वळली आहे. या तरुण पिढीला घरातूनच संस्कार दिले गेले पाहिजे. त्यासाठी घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन देखील गरजेचे आहे, असे मत हभप शिवलिला पाटील यांनी व्यक्त केले.

  वळती : आजची युवा पिढी व्यसनाधीनतेकडे वळली आहे. या तरुण पिढीला घरातूनच संस्कार दिले गेले पाहिजे. त्यासाठी घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन देखील गरजेचे आहे, असे मत हभप शिवलिला पाटील यांनी व्यक्त केले.

  वळती (ता. आंबेगाव) येथे ज्येष्ठांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी झालेल्या किर्तनरुपी सेवेत शिवलीला पाटील बोलत होत्या. याप्रसंगी शरद बँकेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे, सचिन भोर, भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

  दोनशे जेष्ठांचा सन्मान

  याप्रसंगी दोनशे ज्येष्ठ नागरिकांना शाल व गुलाब पुष्प देऊन  सन्मानित करण्यात आले. तसेच गावातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी एक हजार  महिलांचा उस्फुर्त सहभाग आणि प्रतिसाद मिळाला. तसेच उपस्थित महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या.
  त्यानंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

  सध्या सर्वत्र वाढदिवसाचे फॅड आहे. लहानग्यांपासुन तरुणांचे वाढदिवस साजरे होतात.परंतु वळती ग्रामस्थांनी आम्हा ज्येष्ठांचा सन्मान करून वाढदिवस साजरे केले. आम्हाला खूप आनंद झाला, असे स्तुत्य उपक्रम वारंवार राबविले गेले पाहिजेत. यामुळे ज्येष्ठांना विरंगुळा भेटेल.

  – दत्तात्रय धोंडीभाऊ भोर, जेष्ठ नागरिक.