भावकीतील सततचा वाद, याच वादाला कंटाळून अखेर तरूणाची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

शेतातील वडिलोपार्जित विहिरीच्या पाण्यावरून होणाऱ्या वादाला कंटाळून तालुक्यातील कोटनांद्रा येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी भावकीतील दोघांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

    सिल्लोड : शेतातील वडिलोपार्जित विहिरीच्या पाण्यावरून होणाऱ्या वादाला कंटाळून तालुक्यातील कोटनांद्रा येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी भावकीतील दोघांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

    अंकुश विष्णू आहेर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर भास्कर माधवराव आहेर, अविनाश भास्कर आहेर असे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मयताचा भाऊ संतोष विष्णू आहेर यांनी फिर्याद दिली. आरोपी आणि फिर्यादी नात्याने चुलते पुतणे असून, त्यांची वडिलोपार्जित सामाईक विहिर तसेच रस्त्याच्या जाण्या-येण्याचा जुना वाद आहे.

    अंकुश जनावरांना पाणी काढण्यासाठी सामाईक विहिरीवर गेला असता आरोपींनी शिवीगाळ करून हाकलून दिले. त्यामुळे आरोपींच्या पाण्यावरून दिल्या जाणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून अंकुशने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. असा आरोप संतोष विष्णू आहेर यांनी केला. याबाबतची तक्रारही पोलिसांत दिली.