The young man wrote a suicide note and mentioned that he had a sore throat and mental anguish

२१ मे २०२२ रोजी त्याच्या राहत्या घरातील खोलीमध्ये गेला. त्याचे आईवडील हॉलमध्ये बसलेले असतांना बराच वेळ झाला. परंतु, तो रूमच्या बाहेर आलाच नाही. त्यानंतर त्याच्या आईवडिलाने सुजयला आवाज दिला असता प्रतिउत्तर मिळाले नाही. खिडकीतून डोकावून पाहिले असता तो लटकलेल्या अवस्थेत त्याच्या आई - वडिलांना दिसला. सुजयला लटकलेल्या अवस्थेत पाहून आई - वडिलाने आरडा ओरड सुरू केली.

    यवतमाळ : एकुलत्या एक मुलाने सुसाईड नोट लिहून राहत्या घरातील खोलीमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना आज २१ मे २०२२ रोजीच्या संध्याकाळी ५.३० वाजताच्या सुमारास पुसद शहरातील देशमुख नगर येथे उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये त्याने कोणालाही दोषी धरले नसून मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे.

    सुजय संजय गुंबळे ( २४ ) रा. देशमुख नगर असे आत्महत्या करणार्‍या युवकाचे नाव आहे. तो आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य संजय गुंबळे यांचा मुलगा आहे. सुजय हा १२ वी पास झाल्यानंतर दोन वर्षांपूर्वी पुणे येथे शिक्षणाकरिता गेला होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानंतर, तो त्याच्या राहत्या घरी आला असता त्याने २१ मे २०२२ रोजी त्याच्या राहत्या घरातील खोलीमध्ये गेला. त्याचे आईवडील हॉलमध्ये बसलेले असतांना बराच वेळ झाला. परंतु, तो रूमच्या बाहेर आलाच नाही. त्यानंतर त्याच्या आईवडिलाने सुजयला आवाज दिला असता प्रतिउत्तर मिळाले नाही. खिडकीतून डोकावून पाहिले असता तो लटकलेल्या अवस्थेत त्याच्या आई – वडिलांना दिसला. सुजयला लटकलेल्या अवस्थेत पाहून आई – वडिलाने आरडा ओरड सुरू केली.

    त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ दरवाजा खोलून सुजयला येथील एका खासगी दवाखान्यात उपचाराकरिता दाखल केले. मात्र, त्याला सरकारी दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला. उपस्थित डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुसाईड नोटमध्ये त्याने कोणालाही दोषी धरले नाही. त्याने ज्याच्याकडून उधारीवर पैसे घेतले होते, त्या सर्वांचे पैसे परत केले असेही त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आहे. सुजयच्या पश्चात आई-वडील एक विवाहित बहिण असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. सुजयचे शव येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये शवविच्छेदनाकरिता दाखल करण्यात आले आहे.