एकतर्फी प्रेमातून तरुणीला भररस्त्यात मारहाण करुन लुटले, आरोपी अटकेत

कल्याण पूर्वेतील सिद्धार्थ नगर परिसरात भर रस्त्यात एका तरुणाने एका तरुणीचा पाठलाग सुरु केला. पाठलाग करीत तो त्या तरुणीच्या जवळ पोहचला.

    कल्याण : भर रस्त्यात एका तरुणीला बेदम मारहाण केली. तिचा मोबाईल तिच्या हातातून हिसकावून सांगितले की, तू तुझ्या बहिणीला सांग माझ्याशी लग्न कर. मी तिच्याशी प्रेम करतो. इतके बोलून तरुणाने पळ काढला. हेमंत गमरे नावाच्या तरुणाला कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एक तर्फी प्रेमातून या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

    कल्याण पूर्वेतील सिद्धार्थ नगर परिसरात भर रस्त्यात एका तरुणाने एका तरुणीचा पाठलाग सुरु केला. पाठलाग करीत तो त्या तरुणीच्या जवळ पोहचला. त्याने सांगितले की, तुझ्या बहिणीवर प्रेम करतो. ती माझ्याशी बोलत नाही. तिला सांग माझ्याशी लग्न करायला. ही तरुणी तरुणाकडून हे शब्द एकून भयभीत झाली. ती पुढे चालू लागली. इतक्याच या तरुणाने त्या तरुणीला पकडून भर रस्त्यात मारहाण सुरु केली. मारहाण करीत असताना तो हे सांगत होता. की तुझ्या बहिणीला माझ्याशी लग्न करायला सांगत त्या तरुणीचा मोबाईल हिसकावून तो तरुण पळून गेला. मात्र या घटनेची माहिती त्या तरुणीने आणि स्थानिकांनी पोलीसांना दिली.

    पोलीस अधिकारी हेमंत ढोले यांनी या प्रकरणाची माहिती मिळाली. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन स्टाफमधील पोलीस त्वरीत घटनास्थळी रवाना झाले. या दरम्यान एक संशयित तरुण पळताना दिसून आला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. पळणारा तरुण हा तोच तरुण होताा. त्याचे नाव हेमंत गमरे आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.