ओतूरच्या तरुणांची तब्बल २८० किमी पार करत ओतूर ते पंढरपूर सायकलवारी !

शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील युवकांनी श्री क्षेत्र ओतूर ते श्री क्षेत्र पंढरपूर सायकलवारी पूर्ण केल्याची माहिती जयदीप डुंबरे यांनी दिली. या सायकलवारीमध्ये १३ मावळ्यांनी सहभाग नोंदवला असून, ओतूर येथून मोहित ढमाले व डॉ. अमोल डुंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वारीने प्रस्थान केले. 

    ओतूर : शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील युवकांनी श्री क्षेत्र ओतूर ते श्री क्षेत्र पंढरपूर सायकलवारी पूर्ण केल्याची माहिती जयदीप डुंबरे यांनी दिली. या सायकलवारीमध्ये १३ मावळ्यांनी सहभाग नोंदवला असून, ओतूर येथून मोहित ढमाले व डॉ. अमोल डुंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वारीने प्रस्थान केले.

    ओतूर-बेल्हे-निघोज-शिरूर-नाव्हरे-चौफुला-भिगवण-इंदा पूर मार्गे वारी पंढरपूरला पोहोचली. वारीचा पहिला मुक्काम इंदापूरला होता. तर दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता वारी पंढरपूरला पोहोचली. वाटेमध्ये ठिकठिकाणी त्या-त्या ठिकाणच्या गावकऱ्यांनी सायकलवारीचे स्वागत केले. अतिशय आगळीवेगळी आणि पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या सायकलवारीमध्ये १३ ते ७० वयोगटातील सायकल मित्र सहभागी झाले होते.

    ‘सायकल चालवा, तंदुरुस्त राहा, प्रदुषण टाळा’ हा संदेश देत रामकृष्णहरीचा जयघोष करत हे आधुनिक वारकरी जवळपास २८० किमीचा टप्पा पूर्ण करत सायकलवरून पंढरपूरला पोहोचले.

    या वारीमध्ये जयसिंग डुंबरे, विलास तांबे, मारुती घाडगे, प्रदिप गाढवे, रविंद्र डुंबरे, लक्ष्मण नवले, भाऊसाहेब मुरादे, अविनाश गायकवाड, अनिकेत जाधव, रोहित बारसोडे, ओम डुंबरे, तन्मय गाढवे, जयदीप डुंबरे यांनी सहभाग घेतला. ओतूर सायकल ग्रुपने या पंढरपूर सायकलवारीचे आयोजन केले होते.