
कोटेश्वर मंदिराजवळ (Koteshwar temple) दशक्रियेच्या कार्यक्रमासाठी (Dashakrya programs) एक युवक गेला होता. राजू हरिदास झिंगळे (Raju Haridas Jingle) असे या युवकाचे नाव असून हा युवक पूर्णा नदी (Purna River) पात्रात वाहून गेला.
वाठोडा शुकलेश्वर : भातकुली तालुक्यातील खोलापूर (Kholapur in Bhatkuli Taluka) येथे कोटेश्वर मंदिराजवळ (Koteshwar temple) दशक्रियेच्या कार्यक्रमासाठी (Dashakrya programs) एक युवक गेला होता. राजू हरिदास झिंगळे (Raju Haridas Jingle) असे या युवकाचे नाव असून हा युवक पूर्णा नदी (Purna River) पात्रात वाहून गेला. ही खळबळ जनक घटना ३ ऑगस्ट रोजी दुपारीच्या सुमारास घडली आहे.
राजू वाहून गेल्यानंतर त्याला शोधण्याची शोध मोहीम (Search expedition) सुरू करण्यात आली आहे. राजू आढळून न आल्याने त्यांनी तात्काळ तहसील (Tehsil) व पोलीस प्रशासनाला (police administration) कळवले. पोलीस आणि तहसीलदार निता लबडे, ठाणेदार संघरक्षक भगत, तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत. या ठिकाणी राजूचा शोध घेतला जातो आहे. भातकुलीच्या तहसीलदार नीता लबडे यांना माहिती मिळताच तात्काळ त्यांनी रेस्क्यू टीमला पाचारण केले. रेस्क्यू टीमने (Rescue team) शोध मोहीम सुरू केले आहे.