नागरिकांनो, बाहेरगावी जाताना काळजी घ्या; चोरटे झालेत भलतेच अ‍ॅक्टिव्ह !

देशातील सर्वात मोठा सण, दिवाळी उत्सव (Diwali Season) सुरू झाला असून, लोक बाजारात खरेदी करताना आणि घरे रंगवताना दिसत आहेत. दिवाळीच्या निमित्ताने अनेक कुटुंबांना त्यांच्या वडिलोपार्जित राहत्या घरी दिवाळी साजरी करायला आवडते.

    हिंगोली : देशातील सर्वात मोठा सण, दिवाळी उत्सव (Diwali Season) सुरू झाला असून, लोक बाजारात खरेदी करताना आणि घरे रंगवताना दिसत आहेत. दिवाळीच्या निमित्ताने अनेक कुटुंबांना त्यांच्या वडिलोपार्जित राहत्या घरी दिवाळी साजरी करायला आवडते. त्यासाठी शहरात भाड्याने राहणारे लोक व इतर कुटुंबे घरांना कुलूप लावून मूळ गावी जातात. याचा फायदा घेत चोरट्यांनी अनेक घरे फोडून चोरी केली. त्यादृष्टीने हिंगोली शहर पोलिसांकडून नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

    दिवाळीचा सण असल्याने अनेक नागरिकांनी आपापल्या गावी जाऊन गावी घराला कुलूप लावावे, असे हिंगोली शहर पोलिसांनी केले आहे. चोरट्यांनी सदर बंद घराचा फायदा त्या ठिकाणाहून चोरी केली. नागरिकांनी चोरी टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. गावी जाताना, तुम्ही सर्व प्रकारचे दागिने, पैसे, मौल्यवान वस्तू घरात ठेवू नयेत आणि ते सोबत घेऊन जाऊ नये, बंद घरात मौल्यवान वस्तू ठेवू नका, बाहेर जाताना शेजाऱ्यांना कळवा आणि जवळच्या पोलिस स्टेशनलाही कळवा म्हणजे गस्ती पथकाला त्या घरांवर लक्ष ठेवणे सोपे जाताना जाईल.

    रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा आणि त्यांचा मोबाईल नंबर ठेवा किंवा 112 डायल करावा. तुमच्या पुढील कॉलनीत किंवा परिसरात कोणी संशयास्पदरित्या फिरत असेल तर, ताबडतोब 112 वर डायल करावे. घराबाहेर पडताना दारावर उच्च दर्जाचे कुलूप लावावे किंवा दारावर अलार्म बेल लावावी.