गॅरेजमधून पावणे अकरा लाखांचा ऐवज चोरी; पोलीस पाटलासह चौघांवर गुन्हा दाखल

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका गॅरेजमधील साहित्यांसह तब्बल एक लाख रुपये रक्कम चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत सुभाष सोपान जगताप (रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर ) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका गॅरेजमधील साहित्यांसह तब्बल एक लाख रुपये रक्कम चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत सुभाष सोपान जगताप (रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर ) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तळेगाव ढमढेरेचे पोलीस पाटील पांडुरंग विश्वनाथ नरके, भानुदास बबन जाधव, दिनकर बबन जाधव, संजय बबन भुजबळ (सर्व रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे सुभाष जगताप यांचे जगताप नावाने दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. सुभाष हे ऑक्टोबर २०२३ मध्ये गॅरेज उघडण्यासाठी गेलेले असताना गॅरेजचे कुलूप बदलेले असल्याचे दिसले. त्याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात अर्ज दिलेला होता. त्यांनतर जगताप हे दुकानाकडे गेलेले असताना त्यांना गॅरेज उघडे दिसले.
    दरम्यान चौकशी केली असता गॅरेजचे कुलूप उघडून पोलीस पाटील पांडुरंग नरके यांसह आदींनी पिकअप वाहनातून गॅरेज मधील सर्व साहित्य तसेच एक लाख रुपये रोख रक्कम असा तब्बल १० लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले. याबाबत सुभाष जगताप यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
    त्यानुसार पोलिसांनी तळेगाव ढमढेरेचे पोलीस पाटील पांडुरंग विश्वनाथ नरके, भानुदास बबन जाधव, दिनकर बबन जाधव, संजय बबन भुजबळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.