कंपाउंडचे कुलूप तोडून 3 लाखांचा ऐवज लंपास; रेशन व्यावसायिकाच्या घरात जबरी चोरी

हरियानगर परिसरातील स्वस्त धान्य व्यावसायिक आपल्या कुटुंबासह एका कार्यक्रमासाठी मरीमाता मंदिराजवळ येथील मोठ्या भावाकडे गेले होते. तेव्हा त्यांनी घराला कुलूप लावले होते. कार्यक्रमानंतर दुपारी परतले असता, घराच्या कंपाऊंडच्या दाराचे कुलूप तोडून घरात जबरी चोरी (Theft in Murtijapur) झाल्याचे लक्षात आले.

    मूर्तिजापूर : हरियानगर परिसरातील स्वस्त धान्य व्यावसायिक आपल्या कुटुंबासह एका कार्यक्रमासाठी मरीमाता मंदिराजवळ येथील मोठ्या भावाकडे गेले होते. तेव्हा त्यांनी घराला कुलूप लावले होते. कार्यक्रमानंतर दुपारी परतले असता, घराच्या कंपाऊंडच्या दाराचे कुलूप तोडून घरात जबरी चोरी (Theft in Murtijapur) झाल्याचे लक्षात आले. कुटुंबीयांनी लगेच पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, स्वस्त धान्य दुकानदार अजय अग्रवाल (वय 53) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते आपल्या कुटुंबासह मोठ्या भावाकडे सकाळी गेले होते. दुपारनंतर ते परत आले असता अज्ञात चोरट्यांनी घराच्या कंपाऊंडच्या दारावरील कुलूप तोडून घरात प्रवेश केला. या चोरट्यांनी घरातील दोन्ही बेडरूममधील कपाटाचे कुलूप तोडून त्यातील सोन्याची पोत व कानातले असे 1 लाख 60 हजार व रोख 1 लाख 50 हजार असे एकूण 3 लाख 10 हजारांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार स्थानिक सिटी पोलिस ठाण्यात दिली.

    सिटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे, पोलिस उपनिरीक्षक वडतकर, डीबी स्कॉडचे सुरेश पांडे, सचिन दुबे आपल्या पथकासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती अकोला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास दिली.