रांका ज्वेलर्समध्ये मोठी चोरी, तब्बल १७ लाखांची सोन्याची बिस्कीटे घेऊन हेड कॅशियर फरार

रांका ज्वेलर्स (Theft In Ranka Jewellers) या दुकानातून १७ लाख रूपये किमतीची सोन्याची बिस्किटे आणि वेढण्या घेऊन फरार झालेल्या हेड कॅशियरला (Head Cashier Took Golden Biscuits) चिंचवड पोलिसांनी (Chinchwad Police) अटक केली आहे.

    पिंपरी: ज्वेलरी शॉपमधून (Theft In Jewellery Shop) १७ लाख रूपये किमतीची सोन्याची बिस्किटे आणि वेढण्या घेऊन फरार झालेल्या हेड कॅशियरला (Head Cashier Took Golden Biscuits) चिंचवड पोलिसांनी (Chinchwad Police) अटक केली आहे. (Crime)डिसेंबर २०२१ पासून २० मार्च २०२२ या कालावधीत एम्पायर ईस्टेट, चिंचवड येथील रांका ज्वेलर्समध्ये (Theft In Ranka Jewellers) ही घटना घडली.

    राजेंद्र  भंडारी (वय ६५, रा. जय गणेश साम्राज्य पांजरपोळ जवळ, भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तेजपाल रांका (वय ४७, रा. वानवडी, पुणे) यांनी गुरूवारी (दि.२४) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र भंडारी, रांका ज्वेलर्समध्ये हेड कॅशियर म्हणून काम करत होता. फिर्यादी तेजपाल रांका यांनी आरोपी जवळ १७ लाख रूपये किमतीची सोन्याची बिस्किट व वेढण्या विश्वासाने ठेवण्यासाठी दिल्या होत्या. आरोपीने ती बिस्किटे व वेढण्या कोणालाही न सांगता घेऊन फरार झाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.