
विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणासाठी (Digital Education) देण्यात आलेल्या एलईडी टिव्ही चोरट्याने चोरून नेले. ही घटना शनिवारी आर्वी तालुक्यातील अंतरडोह गावात जिल्हा परिषदेच्या (ZP School) शाळेत उघडकीस आली.
वर्धा : विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणासाठी (Digital Education) देण्यात आलेल्या एलईडी टिव्ही चोरट्याने चोरून नेले. ही घटना शनिवारी आर्वी तालुक्यातील अंतरडोह गावात जिल्हा परिषदेच्या (ZP School) शाळेत उघडकीस आली. याप्रकरणी अंगणवाडी सेविकेने दिलेल्या तक्रारीवरून आर्वी पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, अंतरडोह येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत अंगणवाडी आहे. नेहमीप्रमाणे शुक्रवारी विद्यार्थ्यांना सुटी झाल्यावर शाळेला कुलूप लावण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी शाळा उघडली असता शालेय साहित्य ठेऊन असलेल्या खोलीचे दार उघडे दिसले. पाहणी केली असता विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी लावलेली एलईडी टिव्ही दिसून आली नाही.
दरम्यान, चौकशी केली असता शाळा परिसरात असलेल्या अंगणवाडीचे कुलूप तोडून एलईडी टिव्ही चोरीला गेल्याचे दिसून आले. या प्रकरणी शिक्षक लता महादेव कपले यांनी दिलेल्या तक्रारीवरून आर्वी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.