सांगलीत एक दिवसाच्या बाळाची चोरी, चिमुरड्याला चक्क बॅगेत कोंबून महिलेनं काढला पळ

पोलिसांनी रुग्णालयाच्या आजूबाजूचं सीसीटीव्ही तपासून घेतलं असून त्यात बाळ चोरी करणारी महिला दिसून आलीय. आता या संपूर्ण चोरीप्रकरणी बाळ पळवणाऱ्या महिलेचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे.

    सांगली : सांगलीतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. एका महिलेनं एक दिवसांच्या बाळाची चोरी केली आहे. या महिलेन चक्क बॅगेत तिनं एक दिवसांच्या चिमुरड्याला कोंबलं आणि रुग्णालयातून निघून गेली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. सध्या सीसीटीव्ही फुटेज (CCTV Video) च्या माध्यमातून सध्या या महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

    सांगलीच्या तासगावात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. डॉ. अंजली पाटील यांच्या दवाखान्यात नुकतीच एका महिलेचा प्रसूती झाली होती. रविवारी सकाळी एक महिला या दवाखान्यात आली. दवाखान्यात येत असताना ही महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आली आहे. दवाखान्यात गेल्यानंतर ही महिला नर्सचा वेश धारण करते. आपण नर्स असाल्याचं भासवते. त्यानंतर ही महिला प्रसूती झालेल्या महिलांच्या वॉर्डमध्ये जाते. तिथून ती बाळाला आपल्या बॅगमध्ये टाकते आणि क्षणार्धात रुग्णालयातून पळ काढते. रुग्णालयातून बाहेर पडताना या महिलेची धावपळ पुन्हा त्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बाळ चोरी झालंय, हे ध्यानात आल्यानंतर प्रसूती झालेल्या आईसह रुग्णालय प्रशासनालाही मोठा धक्का बसलो. यानंतर पोलिसांत याप्रकरणी करण्यात आली. पोलिसांनी आजूबाजूचं सीसीटीव्ही तपासून घेतलं असून त्यात बाळ चोरी करणारी महिला दिसून आलीय. आता या संपूर्ण चोरीप्रकरणी बाळ पळवणाऱ्या महिलेचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे.