विद्युत रोहित्रांची चोरी, चोरट्यांचा बंदोबस्त करा; शेतकऱ्यांची मागणी

कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द गावात एकाच रात्री दोनच्या सुमारस डाऊच बधांरा या ठिकाणच्या दोन विद्युत रोहित्र फोडण्यात आले. ५० लाखाचे शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. यात मॅग्नेट, आँईल काँयल, चोरी गेले आहे. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली.

    कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द गावात एकाच रात्री दोनच्या सुमारस डाऊच बधांरा या ठिकाणच्या दोन विद्युत रोहित्र फोडण्यात आले. ५० लाखाचे शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. यात मॅग्नेट, आँईल काँयल, चोरी गेले आहे. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली.

    आता सध्या शेतीमध्ये सोयाबीन, कपाशी, मका ही पिके उभी आहेत. पावसाने उघड दिल्याने पिक पाण्यावर आली आहेत. चोरट्यांनी असा डल्ला मारल्या मुळे शेतकऱ्यां समोर अनेक प्रश्न निर्माण झाला आहे. रविवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. डाऊच खुर्द परिसरातील राधाजी काशिनाथ गुरसळ, ज्ञानेश्वर दत्तात्रय गुरसळ यांच्या शेतातील २५ हॉर्स पावर असलेले दोन डीपी रात्री चोरट्यांनी फोडून ५०ते ६० हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या संदर्भात डाऊच खुर्द गावाचे लोकनियुक्त सरपंच गुरसळ यांनी याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, महावितरण कंपनीचे अधिकारी शेलार यांना ही माहिती दिली.

    यावेळी लोकनियुक्त सरपंच संजय गुरसळ यांनी बोलतांना सांगितले की डाऊच खुर्द, चांदेकसारे, जेऊर कुंभारी या भागात विद्युत मोटारी स्टँटर केबल शेतकऱ्यांचे पाईप आदी चोरीचे सत्र सुरू आहे. या चोरट्यांचा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून शेतकऱ्यांनी केली आहे.