…तर घरात घुसून मारु! वाद पुन्हा पेटला, बच्चू कडू यांचे रवी राणांना आव्हान

रवी राणा व बच्चू कडू यांच्यातील वाद शांत होतो न होतो...तोच पुन्हा एकदा या दोघांतील वाद पेटला आहे. सतत दम दिल्यास घरात घुसून मारु असा इशारा बच्चू कडूंनी रवी राणांना दिला आहे. बच्चू कडू पुन्हा आमदार बनणार की नाही हे वेळ सांगेल, असं रवी राणांनी म्हटलं आहे. तसेच हिंम्मत असेल तर पुन्हा निवडून येऊन दाखवां, असं रवी राणांनी बच्चू कडू यांना आव्हान दिलं आहे.

    अमरावती : रवी राणा (Ravi Rana) व बच्चू कडू (Bachu Kadu) यांच्यातील वाद शांत होतो न होतो…तोच पुन्हा एकदा या दोघांतील वाद पेटला आहे. मागील काही दिवसांपासून अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा व प्रहार संघटनेचे अध्यक्ष व अपक्ष आमदारा बच्चू कडू यांच्यात आरोप प्रत्यारोप व जोरदार वाद सुरु होता. मात्र यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी हस्तक्षेप करुन या वादावर पडदा टाकला होता. फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर दोन्ही आमदारांना बोलवत एक एक पाऊल मागे जाण्यास फडणवीसांनी सांगितले होते. त्यानंतर राणा-कडूंची दिलजमाई झाली होता.

    पण रवी राणा व बच्चू कडू यांच्यातील वाद शांत होतो न होतो…तोच पुन्हा एकदा या दोघांतील वाद पेटला आहे. सतत दम दिल्यास घरात घुसून मारु असा इशारा बच्चू कडूंनी रवी राणांना दिला आहे. बच्चू कडू पुन्हा आमदार बनणार की नाही हे वेळ सांगेल, असं रवी राणांनी म्हटलं आहे. तसेच हिंम्मत असेल तर पुन्हा निवडून येऊन दाखवां, असं रवी राणांनी बच्चू कडू यांना आव्हान दिलं आहे. याला प्रतिउत्तर देताना बच्चू कडूंनी थेट राणांना घरात घुसून मारण्याचे आव्हान दिलं आहे. दरम्यान, मी कुठं यावं हे राणांनी सांगाव असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. मी निवडून येईल की, नाही हे जनता ठरवेल तुम्ही कोण सांगणारे असा गर्भित इशारा बच्चू कडंनी राणांना दिला आहे.