…तर माझ्यात दहा हत्तीचं बळ येईल- संतोष बांगर

संतोष बांगर (Santosh Bangar) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. संतोष बांगर आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत मुंबईत येणार आहेत.  कार्यकर्त्यांकडून मंत्रिपदाची मागणी केली जात आहे. तुम्हाला काय वाटते, मंत्री मिळेल का? असे पत्रकारांनी बांगर यांना विचारले असता, यावर "मंत्रिपद कोणाला नको. मंत्रिपद देत असतील तर पुन्हा दहा हत्तींचं बळ माझ्यात येईल आणि मी पुन्हा संघटना वाढवल्याशिवाय राहणार नाही, असा माझा ठाम विश्वास आहे, असं संतोष बांगर म्हणाले.

    हिंगोली : राज्यात सत्तांतर झाले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर दोन दिवसीय विशेष अधिवेशन (Special Adhiveshan) पार पडले. यात विधानसभा अध्यक्ष (Speaker of the Assembly) आणि शिंदे-फडणवीस (Shinde-fadnvis government) सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यानंतर शिंदे गटात आमदारांसह, खासदार व नगरसेवक सुद्धा सामील होत आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेतील गळती कशी रोखायची यावर शिवसेनेत बैठकाचं सत्र सुरु आहे. शिवसेनेत शेवटपर्यत राहणारे पण अखेरच्या क्षणी शिंदे गटात सामील झालेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी मंत्रिपदाबद्दल एक वक्तव्य केलं आहे.

    दरम्यान, संतोष बांगर यांना शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्ष (Hingoli District President) पदावरुन हटवण्यात आले आहे. यानंतर संतोष बांगर (Santosh Bangar) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. संतोष बांगर आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत मुंबईत येणार आहेत.  कार्यकर्त्यांकडून मंत्रिपदाची मागणी केली जात आहे. तुम्हाला काय वाटते, मंत्री मिळेल का? असे पत्रकारांनी बांगर यांना विचारले असता, यावर “मंत्रिपद कोणाला नको. मंत्रिपद देत असतील तर पुन्हा दहा हत्तींचं बळ माझ्यात येईल आणि मी पुन्हा संघटना वाढवल्याशिवाय राहणार नाही, असा माझा ठाम विश्वास आहे, असं संतोष बांगर म्हणाले.

    तसेच जी माझ्यावर शिंदे साहेब जबाबदारी देतील, ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन असं सुद्धा यावेळी बांगर म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.