फिर लेनी पड़ेगी मियाँ को बेल ! मोहित कंभोज यांच्या व्टिटने खळबळ!

क्रूझवरील पार्टीवर एनसीबीने केलेल्या कारवाईत भाजपचे नेते मोहित कंबोज भारतीय यांचा मेव्हणा ऋषभ सचदेव याला एनसीबीने ताब्यात घेतले होते. मुंबईतील भाजपच्या नेत्याने फोन केल्याने ऋषभ याला सोडून देण्यात आले, असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. 

    मुंबई  : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडून एनसीबी आणि भाजपावर कॉर्डिलिया क्रूझ पार्टी  प्रकरणाबाबत नव्या वर्षातही आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरुच आहेत. त्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज मलिक यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यात मलिक यांना यापूर्वी जामिन मिळाला आहे. मात्र  कंभोज यानी फिर लेनी पड़ेगी मियाँ को बेल ! असे व्टिट करत पोस्ट शेअर केल्याने खळबळ उडाली आहे.

    आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच
    क्रूझवरील पार्टीवर एनसीबीने केलेल्या कारवाईत भाजपचे नेते मोहित कंबोज भारतीय यांचा मेव्हणा ऋषभ सचदेव याला एनसीबीने ताब्यात घेतले होते. मुंबईतील भाजपच्या नेत्याने फोन केल्याने ऋषभ याला सोडून देण्यात आले, असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर कंभोज आणि मलिक यांच्या आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे.