…मग चर्चा तर होणारच! सत्तारांनी एकाच वाक्यात सांगितलं ‘सत्ते पे सत्ता’; “कुणाचीही सत्ता आली तरी आपलं नाव…” माझ्या नावातच ‘सत्ता’र, पुढे म्हणाले …

“माझ्या नावात सत्तार आहे…, सत्ता कुणाचीही आली की आपण सत्तेत असतोच", असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. त्यामुळं सत्तार यांच्या या विधानाने तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे शनिवारी हिंगोली जिल्हाच्या दौऱ्यावर होते.

हिंगोली : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणामुळं कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत केलेलं वक्तव्य किंवा अन्य कारणावरुन सत्तार वादात सापडले आहेत. दरम्यान आता राज्यात अवकाळी पावसामुळे (Rain) शेतकऱ्यांची (Farmers) पिके उद्ध्वस्त झाली आहेत. मागील आठवड्यात नुकसानीची रात्रीची पाहणी करण्यासाठी सत्तार गेले असता, त्यांच्यावर टिका झाली होती. त्यानंतर आता सत्तार पुन्हा आपल्या एका नवीन वक्तव्यामुळं चर्चेत आले आहेत.

काय म्हणाले अब्दुल सत्तार?

“माझ्या नावात सत्तार आहे…, सत्ता कुणाचीही आली की आपण सत्तेत असतोच”, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. त्यामुळं सत्तार यांच्या या विधानाने तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे शनिवारी हिंगोली जिल्हाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागात पाहाणी केली. त्यानंतर ते हिंगोली येथील रामलीला मैदानावर आयोजित कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी शेतकऱ्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं, त्यामुळं सत्तारांच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

…आणि एकच हशा पिकला

सत्ता कोणाचीही असो, आपले नाव पक्के आहे, कारण आपल्या नावात ‘सत्ता’र आहे, असं सत्तारांनी म्हणातच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. हिंगोली जिल्ह्यातील पुढच्या सहा महिन्यात सर्व पदे भरले जातील. आमच्या जिल्हा अधिकाऱ्यांना, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पद रिक्त असल्याने फार चिंता लागली आहे. मी तुमच्या सारखाच एक सामान्य कुटुंबातून आलो आहे. बस माझी बॅटरी चार्ज केली आणि मी इथं पर्यंत आलो.  ये जमाना दाढीवालोंका हैं, असं म्हणताच पुन्हा एकदा हशा पिकला.