aaditya thackeray and cm eknath shinde

निवडणूक स्थगित होण्याचं नेमकं कारण तरी काय? हे आम्हाला समजले पाहिजे. कारण सगळे सुरळीत असताना, काही वाद, मारामारी, भांडणं नसताना देखील जो निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता, तो रद्द का केला. याचे कारण कळले, पाहिजे. असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) राज्य सरकारवर केला.

  मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक (senate election) विद्यापीठाने पुढील आदेशापर्यंत स्थगित केली आहे. निवडणुकीचा (Election) कार्यक्रम जाहीर करुन निवडणुका रद्द केल्यामुळं विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर याचे पडसाद राजकीय वर्तुळात देखील उमटत आहेत. दरम्यान, ही निवडणूक स्थगित झाल्यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक स्थगित होण्याचं नेमकं कारण तरी काय? हे आम्हाला समजले पाहिजे. कारण सगळे सुरळीत असताना, काही वाद, मारामारी, भांडणं नसताना देखील जो निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता, तो रद्द का केला. याचे कारण कळले, पाहिजे. असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) राज्य सरकारवर केला. (then the lok sabha elections will also be cancelled senate elections are postponed because this government is scared aditya thackeray criticized the government)

  घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे…

  दरम्यान, पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, तीन महिन्यात मतदारांचं व्हेरिफिकेशन केलं तरीही निवडणुका रद्द झाल्या. विद्यापीठाची बैठक कुठे झाली, बैठकीत झालं. मुंबई विद्यापीठाच्या निवडणुका घेण्यासाठी सत्ताधारी घाबरता, असं वक्तव्य करत आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे निवडणुक स्थगित झाल्या का, असा आरोप देखील आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला.

  …तर त्यांना अटक झाली असती

  मुख्यमंत्री काय करतात, कुठे जातात हे तुम्हाला माहित आहे. सुरुवातीला ते सुरत, गुवाहटी, गोवा करत ते भाजपासोबत गेले नसते तर त्यांना ईंडीने अटक केली असती. असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरेंनी केला. त्यांना कुठल्याच निवडणुका का घ्यायचा नाहीत समजत नाहीत. आम्ही सर्व तयारी केली असताना, आणि कोणतीही वाद नसताना निवडणूक का रद्द केली याचे कारण समजले पाहिजे, असं ठाकरे म्हणाले.

  समोर पराभव दिसत असल्यानं…

  पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सिनेटच्या निवडणुकीत डोळ्यासमोर पराभव दिसत असल्यानं त्यांनी मैदान सोडले आहे. त्यांना हार दिसत असल्यानं ही निवडणूक रद्द केली असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. तसेच ही निवडणूक काय, हे लोकं लोकसभा निवडणूक देखील रद्द करेल, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

  तुम्ही किती डरपोक आहात – राऊत
  सिनेट निवडणूक रद्द केले यात धक्का बसावा असं काही वाटत नाही. या राज्यातलं सरकार कुठलीही निवडणूक घ्यायला तयार नाही. आमचं पॅनल हे शंभर टक्के जिंकणार होतं ही भीती होती या भीतीपोटी या निवडणुका रद्द केल्या आहत. किती निवडणुका रद्द करणार आहात. महापालिकेच्या निवडणुका रद्द केल्या, लोकसभेच्या दोन जागा रिकामी आहेत तेथे देखील निवडणुका घेत नाहीत. उद्या या भीतीपोटी लोकसभा विधानसभा घेणार आहात की नाही? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. पराभव होणार या भीतीपोटी तुम्ही लोकशाहीचा गळा घोटात आहात. निवडणुका घ्यायच्या नाहीत आणि निवडणुकीशिवाय सत्ता गाजवायची हे एक नवीन धोरण या महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे. देशाच्या आर्थिक राजधानीला महापौर नाही आहेत. पुणे, नागपूरला महापौर नाही. आज सिनेटच्या निवडणुका रद्द करून तुम्ही किती डरपोक आहात हे दाखवलं आहे.