…मग मला गटनेते पदावरुन का काढले?, शिंदेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल

शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपसोबत सरकार स्थापन करा अशी अटच मुख्यमंत्री ठाकरे यांना शिष्टाई करण्यासाठी सुरतला गेलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत घातली आहे. दिग्गज मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १५ शिवसेना, एक राष्ट्रवादी आणि १४ अपक्ष आमदार सुरतला गेले असून या गटात आणखी ३ मंत्री असून एकूण ३० आमदार त्यांच्यासोबत गेले आहेत.

    मुंबई – मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Not Rechable) यांनी शिवसेनेत फुट पाडून जोरदार धक्का दिला आहे. शिंदे यांनी ३० आमदारांसह सुरत गाठले असून आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपसोबत सरकार स्थापन करा अशी अटच मुख्यमंत्री (Chief Minister) ठाकरे यांना शिष्टाई करण्यासाठी सुरतला गेलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत घातली आहे. दिग्गज मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १५ शिवसेना, एक राष्ट्रवादी आणि १४ अपक्ष आमदार सुरतला गेले असून या गटात आणखी ३ मंत्री असून एकूण ३० आमदार त्यांच्यासोबत गेले आहेत.

    उद्धव ठाकरेंना काय म्हणाले शिंदे ?

    • एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सुमारे पंधरा मिनिटे चर्चा झाली. यात संजय राऊतांवर नाराजी व्यक्त केली. शिंदेंचा गैरसमज झाला असे राऊत एकीकडे म्हणतात तर दुसरीकडे शिंदेंनी आमदारांचे अपहरण केले असे म्हणतात अशी तक्रारही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
    • मी शिवसेनेविरोधात बोललो नाही, स्वतंत्र पक्ष काढण्याची भाषा केली नाही. पक्षांतर केले नाही ना भाजपसोबत सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही कागदावर सही केली नाही मग मला गटनेते पदावरुन का काढले? असा सवालही शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केला आहे.
    • मला मंत्रीपदाची लालसा नाही. पण भाजपसोबत सरकार स्थापन करा अशी मागणी करीत पुढे काय करायचे ते लवकरच अधिकृतपणे कळवणार आहे असे ठाकरेंना शिंदे म्हणाले.