विवाह इच्छुकांनो, तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी; नियोजन करा सुरू, कारण यंदा सर्वाधिक मुहूर्त

गेल्या वर्षीच्या विवाह मुहूर्तांपेक्षा यंदा अधिक मुहूर्त (Wedding Season) हे येत्या जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत आहेत. या महिन्यात 14 दिवस लग्नमुहूर्त आहेत. त्यादृष्टीने विवाह जोडविण्याचे व करण्याचे नियोजनदेखील करण्यात येत आहे.

    नागपूर : गेल्या वर्षीच्या विवाह मुहूर्तांपेक्षा यंदा अधिक मुहूर्त (Wedding Season) हे येत्या जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत आहेत. या महिन्यात 14 दिवस लग्नमुहूर्त आहेत. त्यादृष्टीने विवाह जोडविण्याचे व करण्याचे नियोजनदेखील करण्यात येत आहे. पुढील महिन्सापासून लग्नसराई सुरू होणार आहे.

    वधू-उपवरांचे लग्न जोडण्यासाठी नातेवाईकांची भेटीगाठी तसेच वर-वधू परिचयाच्या सोशल मीडियावर परिचयपत्र टाकण्याची लगबग सुरू झालेली आहे. तुळशीचे लग्न झाल्यावर वर-वधूच्या लग्नाच्या तयारीला लागणार आहेत. वर व वधू मंडळी लग्नघाईच्या तयारीला लागणार आहेत. सध्यास्थितीत यावर्षी लग्नमुहूर्त जास्त असले तरी मुहूर्त ठरविताना गुरूबल आदी बाबींचा विचार करूनच तारखा दिल्या जातात. यंदा लग्नतारखा जास्त असल्याने वधू-वरांकडील मंडळी सोईस्कर तारखा बघत आहेत.

    विवाह मुहूर्त असलेल्या तारखा

    नोव्हेंबर महिन्यात 1,18, 20, 22, 25, 27, 29 असे आहेत. डिसेंबर महिन्यात 7, 8,14,15, 17, 20, 21, 22, 25, 26, 31, आहेत. जानेवारी महिन्यात 2,3,4,5,6,8, 13, 17, 18, 22, 27, 28, 30, 31 आहेत. फेब्रुवारी महिन्यात 1, 2, 4, 6, 12, 13. 14. 17, 18.24, 26, 27, 28, 29 या आहेत. मार्च महिन्यात 3, 4, 6, 7, 11, 16, 17, 26, 27, 30 तर एप्रिल महिन्यात 1, 3, 4, 5, 18, 20, 21, 22, 26, 28. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत जूनमध्ये 29 व 30 असे विवाह मुहूर्त आहेत.