संपूर्ण पुणे जिल्ह्यात केवळ तीनच महिला आमदार; जाणून घ्या नेमकं राजकारण काय?

लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळण्यासाठी नवे विधेयक संसदेत पारित करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तीन महिलांनाच आमदारकीची (Women in Assembly) संधी मिळाली असल्याचे समोर आले आहे.

    पुणे : लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळण्यासाठी नवे विधेयक संसदेत पारित करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तीन महिलांनाच आमदारकीची (Women in Assembly) संधी मिळाली असल्याचे समोर आले आहे.

    १८८५ मध्ये आंबेगाव विधानसभेमध्ये छाया पडवळ यांना काँग्रेसने उमेदवारी दिली; पण यश काही मिळाले नाही. दौंड विधानसभेमध्ये उषा जगदाळे यांनी दोन टर्म पूर्ण केल्या आहेत. या विधेयकाला लोकसभेत बहुतांश पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

    त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात असलेल्या विधानसभांचा आढावा घेतला असता केवळ तीन महिलांनाच आमदारकीची संधी मिळाल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये १९६१ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या मालतीबाई शिरोळे या विजयी झाल्या आहेत.