राज्यामध्ये “नामर्दांचे सरकार आहे”… खरे हिंदुत्व नाही, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा ओवीसीला औरंगजेबाकडे पाठवेन, नितेश राणेंची राज्य सरकारवर सडकून टिका

आमदार नितेश राणेंनी दोन टिव्ट केले आहे. पहिल्या टिव्टमध्ये त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तर दुसऱ्या टिव्टमध्ये एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवीसी यांना थेट आव्हान दिले आहे. पोलिसांना फक्त 10 मिनिटे बाजूला करा, या ओवीसीला मी औरंगजेबाकडे पाठवतो असं म्हणत त्यांनी ओवीसांना आव्हान दिले आहे. त्यामुळं यावर आता एमआयएमकडून सुद्धा प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

    मुंबई : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट देत, कबरीवर फुले चढवल्याचा फोटो व्हायरल होत आहे. यावरच आता भाजपा आमदार नितेश राणेंनी ओवीसींना थेट आव्हान देत राज्य सरकारवर सुद्धा बोचरी टिका केली आहे.


    दरम्यान, आमदार नितेश राणेंनी दोन टिव्ट केले आहे. पहिल्या टिव्टमध्ये त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तर दुसऱ्या टिव्टमध्ये एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवीसी यांना थेट आव्हान दिले आहे. पोलिसांना फक्त 10 मिनिटे बाजूला करा, या ओवीसीला मी औरंगजेबाकडे पाठवतो असं म्हणत त्यांनी ओवीसांना आव्हान दिले आहे. त्यामुळं यावर आता एमआयएमकडून सुद्धा प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

    पहिल्या टिव्टमध्ये नितेश राणेंनी लिहिलंय की, “मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा.. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर.. आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!” तर दुसऱ्या टिव्टमध्ये  “या कारट्या ओवेसीला माहीत आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्यासमोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्यामध्ये “नामर्दांचे सरकार आहे”… याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व!!” अशी दोन टिव्ट करत त्यांनी राज्य सरकारव सुद्धा निशाणा साधला आहे. तसेच ज्या औरंगजेबने हिंदुची हाल हाल करुन मारले त्यांच्याच कबरीवर नतमस्तक होण्यासाची ओवीसी जातो, पण त्याला राज्य सरकार का आडवत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.