सलग सुट्यांमुळे पन्हाळ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी

दिवाळी सुट्टीच्या अखेरीस शनिवार रविवारच्या सलग सुट्या आल्याने पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पन्हाळगडावर पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत.गेल्या दोन दिवसांपासून पन्हाळगडावर पर्यटकांनी गर्दी केली आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहने पार्किंगची समस्या उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून पन्हाळा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तर नगरपरिषदेचे कर्मचारी पर्यटकांना पार्किंगसाठी मार्गदर्शन करताना दिसत होते.

    पन्हाळा : दिवाळी सुट्टीच्या अखेरीस शनिवार रविवारच्या सलग सुट्या आल्याने पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पन्हाळगडावर पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत.गेल्या दोन दिवसांपासून पन्हाळगडावर पर्यटकांनी गर्दी केली आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहने पार्किंगची समस्या उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून पन्हाळा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तर नगरपरिषदेचे कर्मचारी पर्यटकांना पार्किंगसाठी मार्गदर्शन करताना दिसत होते.
    पन्हाळगड ऐतिहासिक व निसर्गरम्य असे पर्यटन स्थळ आहे. तसेच  एका दिवसाच्या सहलीसाठी जवळचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे नेहमीच गर्दी असते. येथील तीन दरवाजा, सज्जा कोटी, लता मंगेशकर बंगला परिसर ही पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांची रेलचेल दिसत होती. पर्यटकांच्या गर्दीमुळे गडावरील हॉटेल हाऊसफुल्ल आहेत, तर लहान मोठ्या हॉटेलांनाही चांगली कमाई होत आहे.
    पर्यटकांच्या गर्दीमुळे छोट्या – मोठ्या व्यवसायीकांना चांगला धंदा मिळत आहे. लहानग्यानं पासून अबला वृद्धांचे  आकर्षण ठरणारी लंडन बस, रेल्वे,जंपींग राऊंडची पर्यटक मजा घेताना दिसत आहेत. लहान मुले मोटारसायकल, रिक्षा, सायकल हे लहान मुलांचे मोठे आकर्षण ठरत आहे. त्यामुळे ही खेळणी असलेल्या तबक बाग – तीन दरवाजा येथे पर्यटकांची मोठी गर्दी आहे.
    दिपावली सुट्टीतील अखेरचा शनिवार, रविवार असल्याने तीन दरवाजा परिसरात बुरुजावर उभे राहून सेल्फी काढण्यासाठी तरुण – तरुणींची मोठी गर्दी दिसत आहे. पण बुरुज धोकादायक असल्याने दुर्घटना होण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे .