भाजपला पडणार मोठे भगदाड; पिंपरीमधील BJP चा मोठा नेता उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात

  पिंपरी : राज्यातील राजकारणातील बदल याचा परिणाम पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणावर होताना दिसत आहे. भारतीय जनतापार्टीचे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असणारे नेते एकनाथ पवार हे भाजपला सोडचिट्टी देणारअसल्याची चर्चा आहे. पवार हे लवकरच उद्धव ठाकरे यांच्या गटात सामील होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. असे झाल्यास पिंपरी चिंचवड भाजपाला मोठा धक्का बसणार आहे.

  पिंपरीत भाजप आणि शिवसेना यांचे बिनसले

  भाजप आणि शिवसेना यांचे बिनसले आणि शिवसेना बाहेर पडत काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत गेले. त्यांनी महाविकास आघाडी बनवतसरकार बनवले. मात्र हे फार काळ टिकले नाही, शिवसेनेत उभी फूट पडली एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन भाजपला मिळाले आणिमुख्यमंत्री झाले. यातून राज्यातील जनता बाहेर पडते तोच राजकारणात आणखी एक मोठा धक्का बसला.

  पिंपरी चिंचवड शहरात मोठे बदल

  काका शरद पवार यांना सोडून अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेले. राज्यातील या बदलामुळे पिंपरी चिंचवड शहरात काही बदल होत गेले. अनेकजण सत्तेत असणाऱ्यांसोबत गेले.

  कट्टर कार्यकर्ता भाजपला रामराम ठोकणार

  यातच पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीची पाळेमुळे घट्ट करणारा, कट्टर कार्यकर्ता भाजपला रामराम ठोकणार आहे. त्यामुळेशहर भाजपला मोठा धक्का बसणार आहे. माजी नगरसेवक, भोसरी विधानसभा निवडणूक लढवलेले आणि भाजप, केंद्रीय मंत्री नितीनगडकरी यांचे कट्टर असणारे एकनाथ पवार हे लवकरच मुंबई येथे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती घेणारअसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले जात आहे. तसेच त्यांना उद्धव ठाकरे गटाकडून भोसरी विधानसभेचे तिकीट मिळण्याचीशक्यता वर्तवली जात आहे.

  नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक बाहेर पडणार

  एकनाथ पवार हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांनी २०१४ ला भोसरी विधानसभा लढवली होती. त्यावेळी त्यांना ५२ हजार मते पडली होती. त्यानंतर त्यांनी मागच्या वेळी महापालिकेत सभागृह नेते म्हणून काम पाहिले होते. गेले अनेकदिवस ते भाजप सोबत एकनिष्ठ आहेत. मात्र त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला धक्का देखील बसू शकतो, अशीशक्यता वर्तवली जात आहे.

  एकनाथ पवार यांनी केली भूमिका स्पष्ट

  मी सध्या ‘वेट अँड वॉच’ करत असून लवकरच माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. तसेच येत्या काही दिवसात तसे चित्र देखील पहायला मिळेल.