संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

पावसाबाबत एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यात पुण्यासह आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार असून, त्यामुळं पाण्याची चिंता मिटेल, असं हवामान विभागाने (Meteorological Department) म्हटलं आहे.

  मुंबई : ऑगस्ट महिन्यात राज्यात (State) पावसाने (Rain) विश्रांती घेतली. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली. पावसाने दडी मारल्यामुळं शेतकरी अडचणीत आले आहेत. तर पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. मात्र सप्टेबरच्या सुरुवातीला थोडाफार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असताना, आता पावसाबाबत एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यात पुण्यासह आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार असून, त्यामुळं पाण्याची चिंता मिटेल, असं हवामान विभागाने (Meteorological Department) म्हटलं आहे.

  कुठे पडणार पाऊस?

  दरम्यान, बंगालच्या उपसागरात चक्रवात निर्माण झाल्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होणे अपेक्षित आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार आजपासून पुढील तीन दिवस हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यात पाऊस होईल. २२ आणि २३ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट होईल. वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच येत्या २२ ते २४ सप्टेंबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  आत्तापर्यंत किती पाऊस?

  मराठवाड्यात सोयाबीननंतर कापूस, तूर, मका आणि बाजरीचे त्या खालोखाल क्षेत्र आहे. पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. विभागात ४८ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक सोयाबीनचे ५३.२ टक्के क्षेत्र आहे. यावर्षी विभागात जून ते सप्टेंबरचे सरासरी पर्जन्यमान ६१३ मिलिमीटर आहे. मात्र, आतापर्यंत ४६४ मिमी पाऊस झाला आहे. नांदेड, लातूर आणि हिंगोली जिल्हे वगळता इतर पाच जिल्ह्यात भीषण परिस्थिती आहे. मागील आठवड्यात तीन दिवस पावसाने हजेरी लावल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

  अलर्ट कुठे?

  दुसरीकडे राज्यात तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळं राज्यातील विदर्भ आण मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, पुणेे तसेच घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.