राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नाही; दोन्ही गटाचे नेते काय म्हणतात…, नेमकी राजकीय खेळी कोणाची?

विशेष म्हणजे पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँग्रेवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर काही दिवसांतच अजित पवार सत्तेत सहभागी झालेत. यानंतर काल दिल्लीत प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांना भेटले, त्यामुळं ही राजकीय खेळी आहे, शरद पवारांनीच अजित पवारांना भाजपासोबत पाठवले असल्याचं बोललं जातंय. अशी चर्चा सुरु आहे.

  मुंबई : शिवसेनेच्या फूटीनंतर जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (ncp) देखील मोठी फूट पडली आहे. अजित पवार गटाने मोठे बंड करत, ९ मंत्र्यांनी शपथ घेत, सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या फूटीनंतर दोन्ही गटाकडून पक्षावर दावा करण्यात येत आहे. याबाबत निवडणूक आयोगात आता 6 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. मात्र त्याआधी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून पक्षात फूटच पडली नसल्याची वक्तव्यं केली जात असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सरकारमध्ये सहभागी होण्याची ही खेळी आहे का? असा सवाल व शंका उपस्थित केल्या जाताहेत. (there is no division in ncp what do the leaders of both the groups say)

  दोन्ही गटाकडून काय दावा…

  २ जुलै २०२३ रोजी ३० च्यावर आमदार घेऊन सरकारमध्ये सहभागी झाले, यावेळी अजित पवारांसोबत अजित पवारांसह ९ आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली. यानंतर अजित पवारांचा गट सत्तेत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा गट विरोधात आहे. दोन्ही गट पक्ष चिन्ह व पक्षावर दावा करताहेत. मात्र दोन्ही गट म्हणातहेत की राष्ट्रवादीत फूटच पडलेली नाही, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणतायत, पक्षात फूट पडलेली नाही आणि अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळही म्हणतायत की फूट पडलेली नाही. तर पक्षातील काही आमदारांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे, असं शरद पवार म्हणताहेत.

  6 ऑक्टोबरला राष्ट्रवादीवर पहिली सुनावणी

  दरम्यान, राष्ट्रवादीच्या एकूण 53 आमदारांपैकी 40 हून अधिक आमदार आपल्यासोबत आहेत, असा दावा अजित पवारांचा आहे. तसेच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्षही मीच आहे, हेही अजित पवार सांगतायत. त्यामुळं शरद पवार गट आणि अजित पवार गट, या दोन्ही गटाला आयोगानं नोटीस बजावलीय. म्हणजे राष्ट्रवादी कोणाची आणि घड्याळ चिन्हं कोणाला मिळणार? यावर दोन्ही बाजूनं युक्तिवाद होणार आहे. निवडणूक आयोगात 6 ऑक्टोबरला राष्ट्रवादीवर पहिली सुनावणी होणार आहे.

  प्रफुल्ल पटेल-शरद पवार भेटीनं चर्चांना उधाण

  दुसरीकडे दोन्ही गट पक्षावर दावा करत आहेत, तर ऐकमेकांच्या विरोधात देखील बोलत आहेत. तर पक्षात फूट नसल्याचं दोन्हीकडून सांगण्यात येतंय. त्यामुळं नेमकं काय सुरु आहे. अशी शंका येते. विशेष म्हणजे पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँग्रेवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर काही दिवसांतच अजित पवार सत्तेत सहभागी झालेत. यानंतर काल दिल्लीत प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांना भेटले, त्यामुळं ही राजकीय खेळी आहे, शरद पवारांनीच अजित पवारांना भाजपासोबत पाठवले असल्याचं बोललं जातंय. अशी चर्चा सुरु आहे.