
आज दसरा चौकात पवारांची ही सभा होणार आहे. मात्र या सभेच्या शरद पवारांनी मोठे वक्तव्य केल्यामुळं नेमकं काय चाललंय अशी चर्चा सुरु आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, पवारांच्या या वक्तव्यामुळं सर्वाचा भुवय उंचावल्या असून, पवारांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
कोल्हापूर : जुलै महिन्यात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातून अजित पवारांनी बंड केल्यानंतर ते भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. दरम्यान, काल सुप्रिया सुळेंनी (supriya sule) राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट नाही. अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटल्यानंतर आता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक मोठं व धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यामुळं सर्वाचाच भुवया उंचावल्या असून, शरद पवारांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. (There is no division in the party Ajit Pawar is our leader, everyone is surprised by Sharad Pawar’s statement, what is the meaning of Sharad Pawar’s statement)
शरद पवार काय म्हणाले?
आज माध्यमांशी संवाद साधताना, यावेळी त्यांना राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट नाही. अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं, असा प्रश्न विचारला असता, “शरद पवार म्हणाले, बरोबर आहे, आमच्या पक्षात फूट नाही, अजित पवार आमचेच नेते आहेत. पक्षातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. वेगळा निर्णय घेतला आहे. जो त्यांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे. पण याचा अर्थ पक्षात फूट असा होत नाही. पक्षात फूट केव्हा होते, जेव्हा पक्षातील मोठा वर्ग बाहेर गेला तर पक्षात फूट होते. असं शरद पवार म्हणाले.”
नेमका अर्थ काय? कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम…
दरम्यान, बीड, परळी, येवला या सभानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आज (२५ ऑगस्ट, शुक्रवारी) हसन मुश्रीफांच्या (Hasan Mushrif) कोल्हापुरात सभा घेणार आहेत. आज दसरा चौकात पवारांची ही सभा होणार आहे. मात्र या सभेच्या शरद पवारांनी मोठे वक्तव्य केल्यामुळं नेमकं काय चाललंय अशी चर्चा सुरु आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, पवारांच्या या वक्तव्यामुळं सर्वाचा भुवय उंचावल्या असून, पवारांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.