शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, पण देशातील अब्जाधीशांना  मिळते : राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले, भारत जोडो यात्रा केरळमधून महाराष्ट्रात सुरू झाली. विरोधकांनी सवाल केला होता की, यात्रेची काय गरज? या यात्रेचा काय फायदा होणार? मी म्हणतो देशातील कोनाकोपऱ्यात आज भाजपने हिंसा आणि भय उत्पन्न केले आहे. शेतकरी म्हणतात की आम्हाला मालाचा मोबदला योग्य मिळत नाही हे मला असंख्य शेतकऱ्यांनी सांगितले हे ऐकून मला त्रास होत आहे.

    नवी दिल्ली – भाजपने देशात भय, तिरस्कार आणि हिंसा पसरवली आहे. याविरोधात माझी भारत जोडो यात्रा आहे. या देशाला हिंसेने आणि तिरस्काराने फायदा होणार नाही. रस्त्यावर चालणाऱ्यांनाही पाच मिनिटांत लक्षात येईल की, हिंसा कोण पसरवित आहेत, असा जोरदार घणाघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज शेगाव येथे केली. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा शेगावमध्ये असून आज येथे सुरू असलेल्या सभेत ते संबोधित करीत आहेत.

    राहुल गांधी म्हणाले, भारत जोडो यात्रा केरळमधून महाराष्ट्रात सुरू झाली. विरोधकांनी सवाल केला होता की, यात्रेची काय गरज? या यात्रेचा काय फायदा होणार? मी म्हणतो देशातील कोनाकोपऱ्यात आज भाजपने हिंसा आणि भय उत्पन्न केले आहे. शेतकरी म्हणतात की आम्हाला मालाचा मोबदला योग्य मिळत नाही हे मला असंख्य शेतकऱ्यांनी सांगितले हे ऐकून मला त्रास होत आहे. शेतकरी म्हणतात आम्ही काय चुक केली. आमचे कर्ज माफ होत नाही पण देशातील धनाड्यांची, अब्जाधिशांची कर्ज माफ होतात.

    राहुल गांधी यांनी सभेपूर्वी शेगावच्या मंदिरात संत गजानन महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी अभूतपूर्व सुरक्षा आहे. गजानन महाराज मंदिरात येण्याचा त्यांचा पूर्वनियोजित होता, त्यात मनसेच्या इशाऱ्यानंतरही कोणताही बदल करण्यात आला नसून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरूच राहील असे राहुल गांंधी यांनी यापूर्वीच सांगितलेले आहे.