नगरपंचायत निवडणुकीसाठी युतीचे संकेत नाही: थोरात

आंबेगाव तालुक्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच नगरपंचायत निवडणूकीसाठी युतीचे कोणतेही संकेत वरिष्ठ नेत्यांकडून मिळालेले नाही. भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणुकीची तयारी करत आहे.अशी माहिती भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजयशेठ थोरात यांनी दिली.

    मंचर : आंबेगाव तालुक्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच नगरपंचायत निवडणूकीसाठी युतीचे कोणतेही संकेत वरिष्ठ नेत्यांकडून मिळालेले नाही. भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणुकीची तयारी करत आहे.अशी माहिती भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजयशेठ थोरात यांनी दिली.

    प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात संजयशेठ थोरात यांनी म्हटले आहे की, वरिष्ठ नेत्यांचे अजूनही युती संदर्भात कोणतेही आदेश आलेले नाही.वरिष्ठाचा आदेश जो असेल त्यानुसार निवडणुकीमध्ये निर्णय घेतले जातील.आम्ही भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी काम करत आहोत.केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असताना पक्ष संघटना बांधणी कशा पद्धतीने मजबूत होईल. याकडे आम्ही लक्ष देत आहोत.निवडणुकीत युती संदर्भात अजूनही वरिष्ठांचे कोणतेही आदेश आलेले नाही .या विषयावर बैठक झाली नाही.वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.कमळ हे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये चालू आहे. युती संदर्भात देण्यात आलेल्या माहितीचे आम्ही खंडन करतो. अजून पर्यंत तरी बैठकीमध्ये कोणताही निर्णय युती संदर्भात झालेला नाही.