माझ्याविरोधात बदनामीचं षढयंत्र रचलं गेलं आहे. पण ते यशस्वी झाले नाहीत. पोलीस म्हणाताहेत साहेब तुमचे आणि आमचे चांगले संबंध आहेत, पण वरुन आमच्यावर दबाव आहे. बाईला उभं करुन नीच महाभारत रचलं गेलं आहे. या महाभारतातील शकुनी कोण आहे हे माहीत नाही, हे  अत्यंत नीच आहे. महाराष्ट्राने इतक्या खालच्या पातळीचं राजकारण कधीही पाहिलं नाही असं आव्हाड (MLA Jitendra Awad) म्हणाले.

    ठाणे : भाजपाच्या पदाधिकारी रीदा राशीद या महिलेनं आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awad) यांच्यावर विनयभंगाचा आरोप करून गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आज आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awad) यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यात आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा मिळाला असून, अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अटी शर्थीसह ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, त्यामुळं जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा मिळाला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर माध्यमांना सामोरी जाताना आव्हाडांनी धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे.

    मला अडकवण्याचा प्रयत्न होता, राजकारण खालच्या पातळीवर गेलं आहे. माझ्याविरोधात बदनामीचं षढयंत्र रचलं गेलं आहे. पण ते यशस्वी झाले नाहीत. पोलीस म्हणाताहेत साहेब तुमचे आणि आमचे चांगले संबंध आहेत, पण वरुन आमच्यावर दबाव आहे. बाईला उभं करुन नीच महाभारत रचलं गेलं आहे. या महाभारतातील शकुनी कोण आहे हे माहीत नाही, हे  अत्यंत नीच आहे. महाराष्ट्राने इतक्या खालच्या पातळीचं राजकारण कधीही पाहिलं नाही असं आव्हाड (MLA Jitendra Awad) म्हणाले. मला तर जामीन घ्यायचा नव्हताच, मी जेलमध्ये जायला तयार होतो, पण सर्वांचे ऐकावे लागले. जामीनाचा माझ्या चेहऱ्यावर अजिबात आनंद नाही. पोलिसांवर नेमका कोणाचा दबाव आहे याचा शोध घेतला पाहिजे. राजकारण अत्यंत घाणेरड्य होत आहे, अशी प्रतिक्रिया जामीन मंजूर झाल्यानंतर आव्हाडांनी दिली.