
येत्या सप्टेंबर महिन्यात राजकारणात (Maharashtra Politics) मोठा भूकंप येणार असून, मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाणार आहे. राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार असल्याचा दावा काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला.
धाराशीव : येत्या सप्टेंबर महिन्यात राजकारणात (Maharashtra Politics) मोठा भूकंप येणार असून, मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाणार आहे. राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार असल्याचा दावा काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकारणावरून हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. कारण सगळेच सत्तेचे भुकेले आहे. लवकरच शिंदे यांच्या हातातून मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाणार असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील संबंध चांगले नसल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्र्यांना एकत्र जेवणाचे आमंत्रण देतात, पण ते त्यांच्याकडे जात नाही. यावरून महाराष्ट्रात सर्व काही ठीक चालले नाही हे सिद्ध होते. भाजपवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, ‘दंगली पेटविल्याशिवाय भाजप सत्तेत येऊ शकत नाही. गुजरातमधील गोध्रा कांडनंतर देशात भाजपला बळ मिळाले.
देशात पुन्हा केंद्रातील मोदी सरकार 2024 ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी दुसरे गोध्रा कांड घडविण्याच्या तयारीत आहे. येत्या जानेवारी महिन्यात अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराचे उद्घाटन आहे. या कार्यक्रमात देशभरातून लाखो कारसेवक, रामभक्त सहभागी होणार आहे. रामलल्लाचे दर्शन घेऊन कारसेवक निघतील, तेव्हा दंगली घडविल्या जातील, उद्रेक केला जाईल’.
जनता धडा शिकवेल
आमच्याशी बेईमानी केली म्हणून आम्ही शिवसेना किंवा राष्ट्रवादी फोडली आणि त्यांना आमच्याबरोबर घेऊन आलो असे फडणवीस म्हणतात. पण त्यांना गडकरींनी आरसा दाखविला आहे. बेईमानी करणाऱ्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
– संजय राऊत, खासदार, उबाठा.