vinayak raut

संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे यासंदर्भात 18 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दिली.

    मुंबई : सध्याचा ज्वलंत विषय म्हणजे मराठा आरक्षण (Maratha Reservation) आहे. धनगर आरक्षणाचाही तेवढाच गंभीर प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे यासंदर्भात 18 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दिली.

    पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. मागच्या निवडणुकीत ज्या पक्षाने जागा जिंकल्या आहेत त्या जागा त्याच पक्षाला देण्यात येणार आहेत. काही अपवादात्मक परिस्थितीत येणाऱ्या निवडणुकीत ज्या पक्षाच्या उमेदवारात निवडून येण्याची क्षमता असेल, त्याला उमेदवारी दिली जाऊ शकते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट केवळ आणि केवळ ईडीच्या दबावापोटी सत्तेत सामील झाले आहेत.

    भाजपला सत्तेची हाव असते, त्यामुळे दोघांवर दाबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. यावरून डिसेंबरमध्ये राजकारणात मोठा स्फोट घडून येईल, असे भाकीतही त्यांनी वर्तवले आहे. आज अजित पवार यांच्यासारखा कार्यक्षम उपमुख्यमंत्री असल्यामुळे ज्यांना काही कळत नाही ते यामुळे बोलत आहे. अजित पवार यांनासुद्धा हे कळाले असावे यासाठी ते काहीतरी प्रयत्न करत असावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.