चर्चा तर होणारच….! पंकजा मुंडे यांचा बीड दौरा अचानक रद्द; मुंडे-फडणवीस येणार होते एकाच मंचावर, परंतू ‘या’ कारणामुळं…

बीडच्या (Beed) आष्टी तालुक्यातील गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊ यांच्या 47 व्या पुण्यतिथी निमित्त आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गहिनीनाथ गडावरील दौरा रद्द झाला आहे.

    बीड: भाजपा (BJP) महिला नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) ह्या मागील काही दिवसांपासून राजकारणापासून लांब आहे. पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमात त्या हजर नसतात, यावर तर्क वितर्क काढले जातात. त्यामुळं पंकजा मुंडे पक्षश्रेष्ठीवर (Party) नाराज आहेत का? की पक्ष पंकजा मुंडेंवर नाराज आहे? अशा चर्चांना उधाण आलं आहे. तर दुसरीकडे मुंडे भगिनी नाराज असल्याचं बोललं जात आहे. खासकरुन पंकजा मुंडे यांची विधान परिषद (MLC) आमदारकीसाठी वर्णी लागण्याची शक्यता होती, मात्र शेवटच्या क्षणी पक्षश्रेष्ठींनी आणि राज्यातील “मोजक्या” नेत्यांनी त्यांचे तिकीट कापले, तेव्हापासून पंकजा मुंडे ह्या पक्षापासून दुरावला गेल्या असल्याचं चित्र आहे. मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपातील अनेक कार्यक्रमात दिसल्याच नाहीत. तसेच त्यांनी भगवान गडावर (Bhagwan gad) उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. यानंतर मराठवाड्यातील कार्यक्रमात पंकजा मुंडे यांचे निमंत्रण पत्रिकेवर नावच नाही, त्यामुळं पक्षाने देखील पंकजा मुंडेंच्या वकत्यव्याची गंभीर दखल घेतली असं बोललं जात आहे. त्यामुळं पंकजा मुंडे पक्ष सोडणार का? अशी चर्चा सुरु आहे.

    दरम्यान, बीडच्या (Beed) आष्टी तालुक्यातील गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊ यांच्या 47 व्या पुण्यतिथी निमित्त आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गहिनीनाथ गडावरील दौरा रद्द झाला आहे. धनंजय मुंडे हे रुग्णालयात असल्याने ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. तर पंकजा मुंडे यांनीही गहिनीनाथ गडावरील दौरा रद्द केला आहे. यानिमित्ताने फडणवीस व पंकजा मुंडे एकत्र येणार होते, मात्र आता पंकजा मुंडेंनी दौरा रद्द केल्यानं त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.

    दुसरीकडे २२ वर्षानंतर धनंजय मुंडे तब्येत ठिक नसल्यामुळं या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार आहे. तर पंकजा मुंडे यांनीही पहिल्यांदाच हा दौरा रद्द केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ठाकरे गटाने पक्षात येण्याची ऑफर दिल्यानंतर पंकजा मुंडे ठाकरे गटात जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पंकजा मुंडे यांनीही या प्रकरणावर मौन बाळगल्याने पंकजा मुंडे यांच्यावरून शिंदे गट, ठाकरे गट आणि भाजपमध्ये चांगलीच राजकीय पतंगबाजी रंगली होती. मात्र, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.