“…तर राज्यात एकही मराठा शिल्लक राहणार नाही” ; ओबीसी एल्गार सभेत भुजबळ यांचे वक्तव्य

महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून राजकीय संकट निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला.

    महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून राजकीय संकट निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला. मात्र तरीही आपल्या मागणीवरून मागे हटण्यास भुजबळ तयार नाहीत. यानंतर आता छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्वच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिलं तर राज्यात एकही मराठा शिल्लक राहणार नाही, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं. ते हिंगोलीतील ओबीसी एल्गार मोर्चात बोलत होते.

    काय म्हणाले भुजबळ?
    तेजस्विनी चव्हाण यांच्या वक्तव्याचा दाखला देत छगन भुजबळ म्हणाले, “आमच्या एक भगिनी शिवकन्या तेजस्विनीताई चव्हाण त्यांनी सांगितलं की, आम्ही जातीवंत मराठा आहोत. आम्ही कुणबी नाही. आम्हाला कुणब्यांमध्ये टाकायचं नाही. त्यामुळे तुम्ही जर सगळ्या मराठ्यांना कुणबी करणार असाल तर या महाराष्ट्रात एकही मराठा शिल्लक राहणार नाही. सगळे कुणबीच.. सगळे ओबीसीच आणि राज्यात मराठा शिल्लकच राहणार नाही, असं कसं होईल. म्हणून आम्हाला वेगळं आरक्षण द्या, अशी मागणी त्यांनी केली. पण त्यांनाही धमक्या सुरू झाल्या.”

    छगन भुजबळ पुढे म्हणाले, “गरीब मराठा समाजाला आरक्षण द्या. फक्त आमच्यावर बुलडोझर चालवू नका, एवढंच माझं सांगणं आहे. त्यामुळे आमच्या काही मागण्या आहेत. जे मराठा समाजाच्या सारथीला मिळालं, तेच ओबीसी आणि महाज्योती, या सगळ्यांना मिळालं पाहिजे. आपण जी न्यायमूर्ती शिंदे यांची समिती निर्माण केली आहे, ताबडतोब रद्द करावी. कारण सर्वोच्च न्यायालयाने आधीच सांगितलं आहे की, मराठा समाज मागास नाही. त्यामुळे या शिंदे समितीला काहीही अधिकार नाही.”