Ashok Chavan Resignation: These are the 5 reasons behind Ashok Chavan's resignation; Entry of 'Vanchit' and need of Modi-Shah...
Ashok Chavan Resignation: These are the 5 reasons behind Ashok Chavan's resignation; Entry of 'Vanchit' and need of Modi-Shah...

  Ashok Chavan Resignation : ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या सदस्यत्वासोबतचं आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे बंडाच्या आणि फोडाफोडीच्या राजकारणात अभेद्य राहिलेल्या काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मोठा धक्का बसला आहे.

  काँग्रेस पक्ष मराठवाड्यात अव्वल

  ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या सदस्यत्वासोबतच आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे बंडाच्या आणि फोडाफोडीच्या राजकारणात अभेद्य राहिलेल्या काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मोठा धक्का बसला आहे. मराठवाड्यात प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंसारखे मात्तबर नेते असताना काँग्रेस पक्ष मराठवाड्यात अव्वल राहिला आहे. याचे कारण म्हणजे शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुखांचे नेतृत्व. शंकररावांनंतर त्यांचा वारसा अशोक चव्हाणांनी पुढे नेला.

  सुशिक्षित आणि सुसंस्कृत राजकारणी

  एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून अशोक चव्हाणांकडे पाहिलं जातं. आदर्श घोटाळ्याचे आरोप वगळता त्यांची राजकीय कारकीर्द ही उल्लेखनीय राहिलेली आहे. आमदारकी, खासदारकी तसेच महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या चव्हाणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणं, महाराष्ट्र काँग्रेससाठी अडचणीचं ठरणार आहे. पक्षात मानाचे स्थान असणाऱ्या अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडण्याची कारणे नेमकी काय आहेत? असा प्रश्न उपस्थित होतोय.
  पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व

  अशोकरावांची राज्यातील नेतृत्वावर नाराजी

  अशोक चव्हाण हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्याविषयी बोलताना त्यांच्या अनुभवाचे आणि सुसंस्कृत स्वभावाचे सगळेच गोडवे गातात. अशा अशोकरावांची राज्यातील नेतृत्वावर नाराजी असल्याची चर्चा होती. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडल्याची तक्रार त्यांनी केल्याचं सांगण्यात येतं. राज्याप्रमाणेच केंद्रातील नेतृत्वासमोर अनेकवेळा प्रश्न मांडूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने अशोक चव्हाण नाराज होते.

  आदर्श घोटाळा

  आदर्श घोटाळ्यात नाव आल्याने अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होतो. नुकत्याच झालेल्या संसदीय अधिवेशनात मोदींनी काँग्रेसच्या काळातील घोटाळ्यांची श्वेतपत्रिका काढल्याचं स्पष्ट केलं. त्यामध्ये आदर्श घोटाळ्याचा उल्लेख असल्याने आगामी काळात पुन्हा चौकशीचा ससेमीरा मागे लागण्याच्या भीतीमुळे चव्हाणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

  पुन्हा मुख्यमंत्री होणे नाही

  सध्या महाराष्ट्राची राजकीय परस्थिती पाहता मुख्यमंत्री पदासाठी मोठी रांग आहे. त्यामध्ये अशोक चव्हाणांचा नंबर लागणे अशक्य मानलं जातंय. हाताशी असणारा अनुभव आणि प्रसाशनाची उत्तम जाण, यामुळे अशोक चव्हाणांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे. २०२४ ला भाजप पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसोबत गेल्यास आपल्या अनुभावाला साजेस पद मिळण्याची आशा अशोक चव्हाणांना नक्कीच असणार.