file photo
file photo

मंगळवारी ही यात्रा तेलंगणा येथून महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात ही यात्री आहे. दरम्यान,  ‘भारत जोडो यात्रेत’ आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे तसेच माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड हे यात्रेत सहभागी झाले आहेत.

    नांदेड – ‘भारत जोडो यात्रा’ कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास करत आहे. तसेच ही यात्रा ओडीशा, त्रिपुरा राज्यात पदयात्रा सुरु आहेत. पश्चिम बंगाल व इतर राज्यातही अशाच पद्धतीने ‘भारत जोडो यात्रा’ निघत आहेत. दरम्यान, मंगळवारी ही यात्रा तेलंगणा येथून महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात ही यात्री आहे. दरम्यान,  ‘भारत जोडो यात्रेत’ आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे तसेच माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड हे यात्रेत सहभागी झाले आहेत. (ncp leaders came in bharat jodo yatra)

    जयराम रमेश यांची मोदींवर टिका

    दरम्यान, या यात्रेत शिवसेनेकडून उद्या आदित्य ठाकरे सुद्धा सहभागी होणार आहेत, उद्या राहुल गांधींची एक सभा होणार आहे. या सभेसाठी आदित्य ठाकरे हजेरी लावरणार आहे. दरम्यान, आज काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपा तसेच केंद्र सरकारवर टिका केली आहे. केंद्र सरकार ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर केवळ विरोधी पक्षातील लोकांवर दहशत निर्माण करण्यासाठी, त्यांचा छळ करण्यासाठी केला जात आहे. केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागला आहे. ‘मोदी सरकार के दो भाई, ईडी और सीबीआय’, असा टोलाही जयराम रमेश यांनी लगावला.