उत्तरप्रदेश मधून चोरी करायला आले अन जाळ्यात अडकले ; शिक्रापुरात चोरी करुन पळणाऱ्या दोघांना नागरिकांनी रंगेहात पकडले

शिक्रापूर ता. शिरुर येथील एका बंद सदनिकेची चोरी करुन पळून जाणाऱ्या दोघां परप्रांतीयांना नागरिकांनी मोठ्या शिताफीने चोरीच्या मुद्देमालासह रंगेहात पकडले असून आसकीन बसारुद्दिन मलिक व इरफान अन्वर अल्वी असे नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

    शिक्रापूर : शिक्रापूर ता. शिरुर येथील एका बंद सदनिकेची चोरी करुन पळून जाणाऱ्या दोघां परप्रांतीयांना नागरिकांनी मोठ्या शिताफीने चोरीच्या मुद्देमालासह रंगेहात पकडले असून आसकीन बसारुद्दिन मलिक व इरफान अन्वर अल्वी असे नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

    शिक्रापूर ता. शिरुर येथील ग्रीनवूड सोसायटी मध्ये राहणारे किरण जाधव व कोमल जाधव हे दोघे २८ नोव्हेंबर रोजी त्यांच्या सदनिकेला कुलूप लावून दुकानात गेलेले असताना सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कोमल जाधव या घरी आल्या असता त्यांना दरवाजा उघडा असून आतमध्ये कोणतरी असल्याचे दिसल्याने त्यांनी आरडाओरडा केल्याने घरातील दोघे पळून जाऊ लागले मात्र येथील नागरिकांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करत दोघांना पकडले यावेळी घरात पाहणी केली असता घरातील कपाट उघडून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम त्यांनी चोरल्याचे दिसले तर त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरीचा मुद्देमाल देखील मिळून आला, घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार लहानू बांगर, पोलीस शिपाई निखील रावडे यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांनी पकडलेल्या दोघा सराईतांना ताब्यात घेत त्यांनी चोरलेला मुद्देमाल देखील जप्त केला, याबाबत किरण मच्छिंद्र जाधव वय ३० वर्षे रा. ग्रीनवूड सोसायटी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. रांजणी ता. आंबेगाव जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी आसकीन बसारुद्दिन मलिक वय ४० वर्षे रा. मोहल्ला बकरगा ता. सिकंदराबाद जि. बुलंद शहर उत्तरप्रदेश व इरफान अन्वर अल्वी वय ४८ वर्षे रा. मच्छिद्पुरा गल्ली नंबर ५ देहली गेट जि. हाफुड उत्तरप्रदेश या दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व पोलीस शिपाई प्रतिक जगताप हे करत आहे.