“त्यांनी उठोबा-पटोबाचा माणूस पटवला…”, …तर त्यांची चावी कुठं बी चालते, शरद पवारांविषयी काय म्हणाले गुलाबराव पाटील? वाचा…

पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, शरद पवारांनी अशी काही मिसळ तयार केली की, 11 मते घेऊन पाहुण्यांना पाडून आले. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीबद्दल बोलत असताना गुलाबरावांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांना असा टोला लगावला.

जळगाव– मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे आपल्या रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मागच्या महिन्यात त्यांनी सत्तांरावरुन असेच एक धक्कादायक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता त्यांना थेट राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर शरसंधान साधले आहे. “ शरद पवार हे कलाकार आहेत…. शेवटी ते पवार आहेत…. शरद पवार कसे चावी देतात. कधी ही चावी दे, तर कधी ती चावी दे. शरद पवारांची चावी कुठेही चालते. व ते कधीही कुठेही चावी देतील याचा नेम नाही. त्यांनी बरोबर काँग्रेसवाले पटवले. उठोबा-पठोबाचा एक माणूस पटवला आणि अशी मिसळ तयार झाली”. असं गुलाबराव पाटील म्हणाले. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीबद्दल बोलत असताना, गुलाबराव पाटलांनी शरद पवारांवर टिका केली आहे.

जिल्हा बँकेत राष्ट्रवादीकडून खेळी…

दरम्यान, जळगाव जिल्हा बॅकेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे रवींद्र भैय्या पाटील यांचे नाव निश्चित झाले होते. परंतु जळगाव जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते संजय पवार विजयी झाले. राष्ट्रवादीचे संजय पवार यांना मते अधिक मिळाली. गुप्त पद्धतीनं मतदान पार पडलं. यामध्ये संजय पवार विजयी झाले आहेत. याबाबत बोलताना थेट शदर पवार हे कधी कशी खेळी खेळतील याचा काही नेम नाहीय, हेच त्यांच्या बोलण्यातून त्यांना दाखवून द्याचे होते.

11 मते घेऊन पाहुण्यांना पाडून आले…

पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, शरद पवारांनी अशी काही मिसळ तयार केली की, 11 मते घेऊन पाहुण्यांना पाडून आले. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीबद्दल बोलत असताना गुलाबरावांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांना असा टोला लगावला. “शेवटी ते पवार आहेत. शरद पवारांनी काँग्रेसला पटवले, उठोबा पटोबाचा एक माणूस पटवला. शरद पवार कसे चावी देतात. कधी ही चावी दे, तर कधी ती चावी दे. ती चावी कुठं बी चालते, असा गुलाबराव पाटलांनी शरद पवारांना टोला लगावला.