व्यापाऱ्याचे 17 लाख हिसकावून नेणारे चोरटे अटकेत

शहरातील रोशनी ट्रेडिंगचे संचालक चंद्रलाल जीवनानी या व्यापाऱ्याची मोटसायकल अडवून चार लुटारूंनी १७ लाख हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना ३ तारखेला रात्री घडली होती.

    वाशिम – चार दिवसांपुर्वी शहरातील एका व्यापाराचे तब्बल १७ लाख रुपये हिसकावल्याची घटना घडली होती. या घटनेचा छडा लावण्याता पोलिसांना यश आलं असून चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यातकडून ६.५ लाख रोकडही जप्त करण्यात आली आहे.

    शहरातील रोशनी ट्रेडिंगचे संचालक चंद्रलाल जीवनानी या व्यापाऱ्याची मोटसायकल अडवून चार लुटारूंनी १७ लाख हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना ३ तारखेला रात्री घडली होती. पोलिसांनी यंत्रणा फिरवून अवघ्या ३६ तासात चोरट्याचा शोध घेतला आहे. या दरम्यान चार आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडून ६.५ लाख रोकड व एक मोटारसायकल सह ७.५ मुद्देमाल जप्त केला उर्वरीत रक्कम रिकव्हरी करण्यासाठी तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक बच्चनसिह यांनी सांगितले आहे.