इस्लामपुरात दोघा अट्टल चोरट्यांना अटक; साडे चार लाखांच्या नऊ दुचाकी जप्त 

पेठनाका येथे चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी आलेल्या अट्टल चोरट्यासह त्याच्याकडून चोरीच्या गाड्या खरेदी करणाऱ्या साथीदाराला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. दीपक पांडुरंग पाटील-वाघमारे (रा. मंत्री कॉलनी इस्लामपूर) व उमर ईर्शाद सुतार (रा.कोळी मळा इस्लामपूर) अशी चोरट्यांची नावे आहेत.

    इस्लामपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पेठनाका येथे चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी आलेल्या अट्टल चोरट्यासह त्याच्याकडून चोरीच्या गाड्या खरेदी करणाऱ्या साथीदाराला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. दीपक पांडुरंग पाटील-वाघमारे (रा. मंत्री कॉलनी इस्लामपूर) व उमर ईर्शाद सुतार (रा.कोळी मळा इस्लामपूर) अशी चोरट्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून साडे चार लाखांच्या नऊ दुचाकी जप्त केल्या.

    वाढत्या मोटरसायकल चोरीच्या प्रमाणामुळे पोलीस ठाणे हदीमध्ये मोटरसायकल चोरट्याचा शोध घेवून अटक करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. गुन्हेप्रकटीकरण शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण साळुंखे , पोलीस नाईक उत्तम माळी , गणेश शेळके , अमोल सावंत , सुरज जगदाळे , उमेश शेटे , योगेश जाधव यांच पथकाने ही कारवाई केली. इस्लामपुर पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोटरसायकल चोरास पकडण्याचे शोध कार्य सुरु केले.

    दरम्यान, खास बातमीदारामार्फत पेठनाका येथे चोरीच्या गाडीचा व्यवहार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून कारवाई केली.

    पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी कारवाई केली.