सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

टाकळी हाजी (ता. शिरूर) येथिल पुणे जिल्हा परीषदेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे व राष्ट्रपती पदक विजेते निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी महादेव गावडे यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कडी कोयंडे उचकटून चोरटयांनी घरातील तब्बल अडीच लाखांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना घडली.

    शिक्रापूर : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथिल पुणे जिल्हा परीषदेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे व राष्ट्रपती पदक विजेते निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी महादेव गावडे यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कडी कोयंडे उचकटून चोरटयांनी घरातील तब्बल अडीच लाखांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना घडली. शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

    टाकळी हाजी (ता. शिरुर) येथील सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे व त्यांचा मुलगा हे जेवण करुन शेतातील घरात झोपण्यासाठी गेलेले होते. सकाळच्या सुमारास त्यांच्या घराचे दरवाजे उघडे असल्याचे शेजारील नागरिकांना दिसले, त्यांनी प्रभाकर गावडे यांना माहिती देताच त्यांनी घरी येऊन घरात पाहणी केली असता घराच्या दरवाजाचे कडी कोयंडे तुटल्याचे दिसले त्यामुळे घरात पाहणी केली असता घरातील कपाट उघडे तसेच साहित्य अस्ताव्यस्थ पडल्याचे दिसून आले. त्यामुळे कपाटाची तपासणी केली असता कपाटातील पाच तोळे सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम असा अंदाजे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले. याबाबत प्रभाकर गावडे रा. टाकळी हाजी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस करत आहे.