दूध डेअरीतील संगणक चोरणारे चोरटे जेरबंद  

लक्ष्मी दहिवडी येथील दूध डेअरीच्या हिशोबासाठी ठेवलेले ३० हजार रुपये किंमतीचे संगणक चोरल्याप्रकरणी औदुंबर तात्यासो पाटील, अमित प्रकाश पाटील, चंद्रकांत तात्यासो पाटील या तीघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    मंगळवेढा : लक्ष्मी दहिवडी येथील दूध डेअरीच्या हिशोबासाठी ठेवलेले ३० हजार रुपये किंमतीचे संगणक चोरल्याप्रकरणी औदुंबर तात्यासो पाटील, अमित प्रकाश पाटील, चंद्रकांत तात्यासो पाटील या तीघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी बाळासाहेब जुंदळे यांची दूध डेअरी असून दूधाचा हिशोब करण्यासाठी सन २०१७ साली ३० हजार रुपये किमतीचे कॉम्प्युटर घेतले आहे. दि. २१ रोजी रात्री ८ वा. दूध डेअरी बंद करून ते घरी गेले. दि. २२ रोजी सकाळी ६ वा. डेअरी उघडण्यासाठी आले असता त्यांना डेअरीचे शटर उचकटल्याचे दिसले. आत जावून पाहिले असता ते संगणक चोरट्यांनी पळविल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अज्ञात चोरटयाविरूध्द पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरिक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली यातील तपास अधिकारी पोलीस हवालदार प्रमोद मोरे यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी औदुंबर तात्यासो पाटील व अमित प्रकाश पाटील या दोघांना अटक केली आहे. तर चंद्रकांत पाटील याला अधिक उपचारासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.