मोबाईलच्या टॉवरमधून चोरट्यांनी ६ रूस कार्ड चोरले..!

वानवडी परिसरात मोबाईल टॉवरमधून चोरट्यांनी ५० हजार रुपयांचे ६ रूस कार्ड काढून चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे.

    पुणे : वानवडी परिसरात मोबाईल टॉवरमधून चोरट्यांनी ५० हजार रुपयांचे ६ रूस कार्ड काढून चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अनुराग रागी (वय ४०) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे.

    तक्रारदार हे इंडस मोबाईल टावर्सचे देखभाल व दुरूस्तीचे काम करतात. त्यांच्या कंपनीने सातवनगर परिसरात इंडस कंपनीच्या टॉवरर्समध्ये वोडाफोन व आयडिया कंपनीचे रूस कार्ड बसविलेले होते. ते चोरट्यांनी मध्यरात्री काढून चोरून नेले. पुढील तपास पोलीस करत आहेत.