अंत्यसंस्काराला जाणं महिलेला पडलं महागात; घरफोडी करत 4.93 लाखांचे दागिणे चोरट्यांनी केले लंपास

नातेवाईकाकडे अंत्यसंस्कारासाठी जाणे एका महिलेला चांगलेच भोवले. अज्ञात आरोपीने घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 4 लाख 93 हजाराचा मुद्देमाल चोरून नेला.

    कन्हान : नातेवाईकाकडे अंत्यसंस्कारासाठी जाणे एका महिलेला चांगलेच भोवले. अज्ञात आरोपीने घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 4 लाख 93 हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना स्थानिक पोलिस स्टेशनअंतर्गत इंदिरानगर सुंदरबाई गजबिये लेआऊटमध्ये नुकतीच घडली.

    इंदिरा मुरलीधर चिखले (वय 55, रा. इंदिरानगर) सुंदरबाई गजबिये या नातेवाईक शांताराम खोरगडे (रा. गडमी ता. सावनेर) यांच्या घरी निधन झाल्याने तेथे अंत्यसंस्कारासाठी गेल्या होत्या. हिच संधी साधून अज्ञात आरोपीने त्यांच्या खुल्या घरात प्रवेश केला. जांभळ्या रंगाच्या हॅन्डबॅगच्या पॉकिटमधील सोन्याची पोत, सोन्याचा बकुळी हार, सोन्याचा मणी, सोनसाखळी, सोन्याची नथ, सोन्याचे डोरले, सोन्याचा ओम लिहिलेला लॉकेट, सोन्याचा टॉप्स कानातले, सोन्याचे छोटे टॉप्स, सोन्याचे कानातले जोडी टॉप्स असे एकूण 123 ग्रॅम सोने व चांदिचे मनघटे व चाळ असा एकूण 4 लाख 93 हजार 400 रुपयाच्या मुद्देमालावर हातसाफ केला.

    इंदिराबाई अंत्ससंस्कारावरून घरी परतल्या, तेव्हा त्यांना घडलेला सर्व प्रकार लक्षात आला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.