डेक्कनमधील बंद फ्लॅट फोडणाऱ्या चोरट्यांना अटक

डेक्कन परिसरातील बंद फ्लॅट फोडणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून ५ लाख १२ हजारांचे दागिने जप्त केले आहेत. सुहास चंद्रकांत दिघे (वय ३०, रा. एरंडवणा) व अनिल बाबु बावधने (वय २३, रा. कर्वेनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

    पुणे : डेक्कन परिसरातील बंद फ्लॅट फोडणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून ५ लाख १२ हजारांचे दागिने जप्त केले आहेत. सुहास चंद्रकांत दिघे (वय ३०, रा. एरंडवणा) व अनिल बाबु बावधने (वय २३, रा. कर्वेनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पाहिजे व फरार आरोपींची माहिती घेतली जात असताना पोलीसांना या दोघांनी डेक्कन परिसरातील फ्लॅट फोडल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, पोलीस निरीक्षक अनिता मोरे व त्यांच्या पथकाने या दोघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेले ५ लाख १२ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.