
स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, माकप, सुराज्य, समाजवादी, बहुजन विकास आघाडी, माकप, भाकप यासह विविध १३ पक्षांनी एकत्र येत राज्यात प्रागतिक विचार मंच या नावाने तिसरी आघाडी स्थापन केली आहे. यातील बहुसंख्य पक्ष ‘इंडिया’ आघाडीत सहभागी झाले आहेत.
मुंबई : केंद्रातील भाजपाला रोखण्यासाठी देशातील जवळपास २६ पक्ष एकत्र आले आहेत. आता या पक्षांना आणखी १३ पक्षांचा पाठिंबा मिळणार आहे. इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक तोंडावर येऊन ठेपली आहे. ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीचे आयोजन ठकरे गटाचे प्रमुख उदधव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. या बैठकीतून पवार-ठाकरे यांची ताकद दिसणार आहे. दरम्यान, आता इंडिया आघाडीला अन्य १३ पक्षांचा पाठिंबा मिळणार असल्यामुळं इंडिया आघाडीला मोठे बळ मिळाले असून, हे १३ पक्ष मुंबईतील बैठकीत दिसणार आहेत. (thirteen more parties support india aghadi do you know which parties successful preparation of the meeting)
कोणते आहेत १३ पक्ष?
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, माकप, सुराज्य, समाजवादी, बहुजन विकास आघाडी, माकप, भाकप यासह विविध १३ पक्षांनी एकत्र येत राज्यात प्रागतिक विचार मंच या नावाने तिसरी आघाडी स्थापन केली आहे. यातील बहुसंख्य पक्ष ‘इंडिया’ आघाडीत सहभागी झाले आहेत. पूर्ण प्रागतिक मंचच त्यामध्ये सहभागी होणार आहे. याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाणार आहे. शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या पुढाकाराने तशी महाविकास आघाडीबरोबरच चर्चा सुरू आहे. ही चर्चा सकारात्मक झाल्यास हे १३ पक्ष ‘इंडिया’ आघाडीला पाठिंबा देणार आहेत.
आघाडी स्थापन करण्यासाठी नितीश कुमारांचे प्रयत्न
विरोधी पक्षांना एकत्रित आणत आघाडी स्थापन करण्यासाठी नितीश कुमार यांनीच प्रयत्न केले होते. मात्र आज जेव्हा विरोधक सक्षमपणे एकत्र येत आहेत तेव्हा मात्र नितीश कुमार महत्त्वाच्या पदापासून दूर राहण्याची भूमिका घेत आहेत. त्यांनीच याबाबत एक विधान केलं आहे.
मला विरोधी आघाडीचा समन्वयक व्हायचे नाही
नितीश कुमार यांनी सोमवारी सांगितलं की, मला विरोधी आघाडीचा समन्वयक व्हायचं नाही. या पदाची जबाबदारी दुसऱ्या कुणाकडे तरी जाईल. आमचा प्रयत्न सर्वांना सोबत ठेवण्याचा आहे. नितीश कुमारांचा समन्वयकांमध्ये समावेश होईल, अशी चर्चा सध्या सुरु होती. परंतु त्यांच्याच विधानाने आश्चर्य व्यक्त होत आहे.